Asia Cup 2025 : पाकिस्तानचा खेळ पाहून चिडला, स्टार खेळाडूने निवृत्ती मागे घेतली,कोण आहे क्रिकेटर?

Last Updated:

पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात Ak-47 आणि 6-0 असे वादग्रस्त अॅक्शन केल्या होत्या. या अॅक्शन पाहून आता एका स्टार खेळाडूने निवृत्ती मागे घेतली आहे.

Asia Cup 2025
Asia Cup 2025
Asia Cup 2025 : भारत आणि पाकिस्तानमधला हायव्होल्टेज सामना पाहून अनेक दिग्गज खेळाडूंसह जगभरातील चाहते वेडे झाले आहेत. या सामन्यात भारताने सहा विकेटस राखून पाकिस्तानला धुळ चारली होती. याआधी सामन्यात अनेक राडे झाले होते. पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात Ak-47 आणि 6-0 असे वादग्रस्त अॅक्शन केल्या होत्या. या अॅक्शन पाहून आता एका स्टार खेळाडूने निवृत्ती मागे घेतली आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर हा खेळाडू भारतीय असावा,अशीच सगळ्यांची अपेक्षा असेल. पण हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून साऊथ आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डीकॉक आहे. क्विंटन डीकॉक मागच्याच काही वर्षापुर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.पण आता त्याने पाकिस्तान दौऱ्यासाठी निवृत्ती मागे घेतली आहे.त्यामुळे त्याला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठी तसेच त्यापूर्वी नामिबियामध्ये होणाऱ्या एकमेव टी20सामन्यासाठी एकदिवसीय आणि टी20 संघात स्थान देण्यात आले आहे.
advertisement
डी कॉकने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर 50 षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.तर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा व्हाईट-बॉल सामना 2024 मध्ये बार्बाडोसमध्ये खेळला होता. हा सामना टी20 विश्वचषकातला अंतिम सामना होता. तसेच डी कॉक कधीही अधिकृतपणे टी20 सामन्यांमधून निवृत्त झाला नसला तरी, त्याला दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही संघात स्थान देण्यात आले नव्हते. दरम्यान, तो अलीकडेच संपलेल्या सीपीएलसह जगभरातील टी20 लीगमध्ये सक्रिय होता.
advertisement
सध्याचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी डी कॉकशी चर्चा केली आहे आणि सांगितले आहे की तो पुन्हा राष्ट्रीय संघासाठी वचनबद्ध आहे.क्विंटनचे व्हाईट-बॉलच्या क्षेत्रात पुनरागमन आमच्यासाठी एक मोठे प्रोत्साहन आहे,कॉनराड म्हणाले.गेल्या महिन्यात जेव्हा आपण त्याच्या भविष्याबद्दल बोललो तेव्हा हे स्पष्ट होते की त्याच्याकडे अजूनही त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा आहे. तो संघात कोणत्या दर्जाचा गुण आणतो हे सर्वांना माहिती आहे आणि त्याला परत आणल्याने संघालाच फायदा होऊ शकतो, असे कॉनराड यांनी सांगितले.
advertisement
कारकिर्द
डी कॉकने 155 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 45.74 च्या सरासरीने आणि 96.64 च्या स्ट्राईक रेटने 6770 धावा केल्या आहेत.92 टी20 सामन्यांमध्ये त्याने 138.32 च्या स्ट्राईक रेटने 2584 धावा केल्या आहेत. त्याने 2015, 2019 आणि 2023 तीन एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत.आणि निवृत्तीनंतर त्याने गमावलेली एकमेव आयसीसी स्पर्धा म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिथे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत बाद झाली होती.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : पाकिस्तानचा खेळ पाहून चिडला, स्टार खेळाडूने निवृत्ती मागे घेतली,कोण आहे क्रिकेटर?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement