advertisement

Ranji Trophy : W,W,W,W,W...धोनीच्या शिलेदाराने अख्खं टॉप ऑर्डर फोडलं, अवघ्या काही धावातच प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळलं

Last Updated:

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू एम एस धोनी याचा शिलेदाराने अख्खी मॅच फिरवली आहे. धोनीच्यी या शिलेदाराने प्रतिस्पर्ध्याचे पाच विकेट काढून अर्धा संघ तंबूत धाडला होता.त्यामुळे मध्यप्रदेशचा संघ 200च्या आत ऑलआऊट झाला होता.

Ranji Trophy
Ranji Trophy
Ranji Trophy News : रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्यात सामना सूरू आहे.या सामन्यात महाराष्ट्राचा पठ्ठ्या आणि टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू एम एस धोनी याचा शिलेदाराने अख्खी मॅच फिरवली आहे. धोनीच्यी या शिलेदाराने प्रतिस्पर्ध्याचे पाच विकेट काढून अर्धा संघ तंबूत धाडला होता.त्यामुळे मध्यप्रदेशचा संघ 200च्या आत ऑलआऊट झाला होता.
खरं तर मध्यप्रदेशचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता.यावेळी मध्यप्रदेश डावाची चांगली सुरूवात करेल असे वाटत होते. पण महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सूरूवातीपासूनच भेदक गोलंदाजी करून एका मागून एक मध्यप्रदेशच्या फलंदाजांना आऊट करायला सूरूवात केली होती होती. पहिल्यांदा धोनीचा शिलेदार राजवर्धन हंगेरकर याने पहिल्यांदा हिमांशु मंत्री याला 8 धावांवर क्लिन बोल्ड केले.त्याच्यानंतर राजवर्धन हंगरगेकरने पुन्हा यश दुबेला सौरभ नेवालेच्या हातात कॅच देऊन त्याला बाद केले. अशाप्रकारे त्याने दोन्ही सलामीवीरांना गुंडाळलं.
advertisement
त्याच्यानंतर हंगरगेकर कर्णधार रजत पाटीदारला क्लिन बोल्ड करून स्वस्तास निपटवलं. त्याच्या जोडीला जलज सक्सेना देखील आला आणि त्याने शुभम शर्मा आणि व्यंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर अर्शिल कुलकर्णीने अक्षत रघुवंशी आणि सारांश जैनला स्वस्तात बाद केले.यानंतर पुन्हा राजवर्धन हगरगेकरने कुमार कार्तिकेया आणि कुलदीप सेनची झटपट विकेट काढून मध्यप्रदेशचा डाव 187 धावांवर गुंडाळला.
advertisement
महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकर सर्वाधिक 5 तर अर्शिन कुलकर्णी आणि जलज सक्सेनाने प्रत्येकी 2 विकेट घेतले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : W,W,W,W,W...धोनीच्या शिलेदाराने अख्खं टॉप ऑर्डर फोडलं, अवघ्या काही धावातच प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळलं
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement