पोरींनी मायानगरीत वर्ल्ड कप जिंकला, पण 5 दिग्गज असूनही मुंबईची वाईट अवस्था, स्कोअरबोर्ड पाहून तुम्हालाही वाईट वाटेल!

Last Updated:

राजस्थानविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. 5 दिग्गज खेळाडू टीममध्ये असूनही या सामन्यात मुंबईला संघर्ष करावा लागत आहे.

पोरींनी मायानगरीत वर्ल्ड कप जिंकला, पण 5 दिग्गज असूनही मुंबईची वाईट अवस्था, स्कोअरबोर्ड पाहून तुम्हालाही वाईट वाटेल!
पोरींनी मायानगरीत वर्ल्ड कप जिंकला, पण 5 दिग्गज असूनही मुंबईची वाईट अवस्था, स्कोअरबोर्ड पाहून तुम्हालाही वाईट वाटेल!
मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये भारताने आणखी एका वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवला. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला टीमने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास घडवला. भारतीय महिला टीमला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला. या विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. मुंबईमध्ये भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिंकलेला असतानाच सर्वाधिक वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबईची अवस्था मात्र वाईट झाली आहे.
राजस्थानविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. राजस्थानने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईचा पहिल्या इनिंगमध्ये 254 रनवर ऑलआऊट झाला, त्यानंतर राजस्थानने 617/6 रवरन डाव घोषित केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचा स्कोअर 89/0 एवढा झाला आहे, त्यामुळे मुंबई अजून 274 रननी पिछाडीवर आहे. यशस्वी जयस्वाल 56 रनवर आणि मुशीर खान 32 रनवर खेळत आहेत. मुंबईच्या टीममध्ये यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे हे पाच दिग्गज खेळाडू असूनही मुंबईला संघर्ष करावा लागला आहे.
advertisement
पहिले बॅटिंग करताना मुंबईकडून जयस्वालने 67 आणि मुशीर खानने 49 रन केले, पण त्यानंतर मुंबईची बॅटिंग गडगडली आणि 254 रनवर मुंबईचा ऑलआऊट झाला. यानंतर बॅटिंगला आलेल्या राजस्थानने 617 रनचा डोंगर उभारला. दीपक हुड्डाने 218 रन तर कार्तिक शर्माने 139 रनची खेळी केली, याशिवाय सचिन यादवनेही 92 रन केले. मुंबईकडून शम्स मुलानी आणि तुषार देशपांडेला 2-2 विकेट मिळाल्या, तर जयस्वालनेही एक विकेट घेतली.
advertisement

मुंबईची या मोसमातली कामगिरी

रणजी ट्रॉफीच्या या मोसमात मुंबईने जम्मू-काश्मीरविरुद्धचा पहिला सामना 35 रननी जिंकला, त्यानंतर छत्तीसगडविरुद्धचा सामना मुंबईने ड्रॉ केला, आता राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पराभव टाळण्यासाठी मुंबईला उद्या दिवसभर बॅटिंग करावी लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पोरींनी मायानगरीत वर्ल्ड कप जिंकला, पण 5 दिग्गज असूनही मुंबईची वाईट अवस्था, स्कोअरबोर्ड पाहून तुम्हालाही वाईट वाटेल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement