Ranji Trophy : सरफराजच्या भावाने आधी शतक ठोकलं, मग LIVE मॅचमध्ये ढसाढसा रडला,मैदानात नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या आजच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना सरफराज खानचा भाऊ मुशीर खानने हिमाचल विरूद्ध शकत ठोकलं आहे.हे शतक ठोकल्यानंतर मुशीर खानच्या डोळ्यात अश्रू होते.
Musheer Khan century : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या आजच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना सरफराज खानचा भाऊ मुशीर खानने हिमाचल विरूद्ध शकत ठोकलं आहे.हे शतक ठोकल्यानंतर मुशीर खानच्या डोळ्यात अश्रू होते. त्यामुळे अचानक मुशीरला रडताना पाहून सगळ्यांचा मोठा धक्का बसला. पण त्यामागे एक मोठं कारण होते. कारण सामना सुरू होण्यापूर्वीच खान बंधुंना एक वाईट बातमी आली होती.त्यामुळे मुशीर खानला रडला होता.
मुशीर खानने 143व्या चेंडूवर डावखुरा फिरकीपटू आर्यमन धालीवालच्या चेंडूवर मिडविकेटला एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर मुशीरने हवेत उडी मारली आणि आनंद साजरा केला आणि हे दाखवून दिले की ही खेळी त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे. हेल्मेट काढताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले.कारण सकाळीच त्याच्या मामाचा निधन झालं होते. त्यामुळे त्याने हे शतक त्यांना समर्पित केलं होते. त्याच्या मामाने त्याला क्रिकेटपटू बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.त्यामुळेच त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.
advertisement
सामन्यानंतर बोलताना मुशीर म्हणाला,सर्वप्रथम हे शतक खूप दिवसांनी आले आहे. दुसरे म्हणजे, आज सकाळी माझे काका गेले. त्यामुळे मला खूप वाईट वाटत होते. मी लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो आहे. मी त्यांच्यासोबत खेळलो आहे. त्यामुळे मला थोडे विचित्र वाटले. शतक पूर्ण केल्यानंतर मी भावनिक झालो. म्हणूनच मी थोडे रडलो,असे त्याने सांगितले.
खरं तर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण सलामीवीर आयुष म्हात्रे अवघ्या 9 धावा करून बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ आलेला अजिंक्य देखील 2 धावांवर बाद झाला.अजिंक्यनंतर हिमांशु सिंहला आला पण तो शुन्यावर बाद झाल्याने आल्या पावली माघारी गेला.
advertisement
मुंबईचे एका मागून एक विकेट पडत असताना मुशीर खान मात्र एका बाजूने संघाचा डाव सावरून होता. यावेळी त्याचा मोठा भाऊ सरफराज खान मैदानात आला होता. त्यामुळे दोघे मुंबईचा डाव पुढे नेतील असे वाटत असताना सरफराज खान 16 वर बाद झाला होता.त्यामुळे मुंबईची 74 धावांवर 4 बाद अशी बिकट अवस्था झाली होती.
advertisement
दरम्यान सिद्धेश लाड आणि मुशीर खानने मुंबईचा डाव सावरला होता. मुशीर खानने 161 बॉलमध्ये 112 धावांची शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 14 चौकार लगावले आहेत. मुशीर सोबत सिद्धेश लाडने 207 बॉलमध्ये नाबाद शतक केले आहे. या खेळीत त्याने 14 चौकार मारले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या धावांच्या बळावर सध्या मुंबई 5 विकेट गमावून 895 धावांपर्यंत मजल मारू शकली आहे.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी मुंबईचा डाव सावरला आहे.
advertisement
मुंबईचा संघ : आयुष म्हात्रे, मुशीर खान, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सरफराज खान, आकाश आनंद (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर (कर्णधार), हिमांशू सिंग, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डीसूझा
हिमाचलचा संघ : सिद्धांत पुरोहित, अंकुश बैंस (कर्णधार/ विकेटकिपर), अंकित कलसी, पुखराज मान, एकांत सेन, निखिल गंगटा, मयंक डागर, आर्यमान सिंग, वैभव अरोरा, अर्पित गुलेरिया, विपिन शर्मा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 11:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : सरफराजच्या भावाने आधी शतक ठोकलं, मग LIVE मॅचमध्ये ढसाढसा रडला,मैदानात नेमकं काय घडलं?


