R Ashwin Record : अश्विन अण्णाच भारी!IPL मध्ये सर्वांत बेस्ट रेकॉर्ड,दूर दूरपर्यंत कुणी नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अश्विनने जो एक रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डमध्ये दूर दूरपर्यंत कुणी नाही आहे.त्यामुळे हा रेकॉर्ड नेमका काय आहे? हे जाणून घेऊयात.
R Ashwin Record : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर.अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दित त्याने एकूण 221 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने पाच संघाचे नेतृत्व केले होते. या त्याच्या कारकिर्दीत त्याने असंख्य रेकॉर्ड केले आहेत. यापैकी अश्विनने जो एक रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डमध्ये दूर दूरपर्यंत कुणी नाही आहे.त्यामुळे हा रेकॉर्ड नेमका काय आहे? हे जाणून घेऊयात.
आर अश्विनने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बॉल टाकल्याचा विक्रम केला आहे. अश्विनने आयपीएलमध्ये 4 हजार 710 बॉल टाकण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याच्यानंतर कोलकत्ताच्या सुनील नरीनचा नंबर लागतो.कारण सूनील नरीनने आयपीएलमध्ये 4 हजार 345 बॉल टाकले आहेत. भूवनेश्वर कुमार या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. भूवनेश्वर कुमारने 4 हजार 222 बॉल टाकले आहेत. तर अश्विनचा सहकारी रविंद्र जडेजाने 4 हजार 56 बॉल टाकले आहेत.त्यामुळे अश्विनचा रेकॉर्ड पाहता त्याच्या नजीक पोहोचायला इतर गोलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
advertisement
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड अश्विनच्या नावावर आहे, अश्विनने प्लेऑफमध्ये 21 विकेट घेतले आहेत. तर त्याच्या खालोखाल रविंद्र जडेजा आहे.जडेजाने 19 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर हरभजन सिंहचा नंबर लागतो. हरभजन सिंहने 17 विकेटस घेतल्या आहेत. तर चौथ्या स्थानी युजवेंद्र चहल आहे. चहलच्या नावावर 13 विकेट आहेत.
निवृत्तीच्या पोस्टमध्ये अश्विन काय म्हणाला?
advertisement
खास दिवस आणि एक खास सुरुवात. प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते असे म्हणतात. आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा प्रवास आज संपतो पण मी खेळाचा शोध घेत राहतो आणि वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत राहीन, असं आर अश्विन म्हणाला आहे. प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा काळ आज संपत आहे, परंतु विविध लीगभोवती खेळाचा शोध घेणारा माझा काळ आजपासून सुरू होतोय, असंही अश्विनने म्हटलंय.
advertisement
38 वर्षीय ऑफ-स्पिनर अश्विनने 221 आयपीएल सामन्यांमध्ये 187 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 7.20 होता. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 4/34 होती. याशिवाय, त्याने 98 डावांमध्ये 833 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 50 होती. अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5 संघांसाठी खेळला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्याने स्पर्धेत पंजाबचे नेतृत्वही केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
R Ashwin Record : अश्विन अण्णाच भारी!IPL मध्ये सर्वांत बेस्ट रेकॉर्ड,दूर दूरपर्यंत कुणी नाही


