बंगळुरू चेंगराचेंगरीच्या 3 महिन्यांनंतर RCB ला जाग आली, 11 मृत्यूंबाबत काय म्हणाली विराटची टीम?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीने चाहत्यांना हा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बोलावलं, यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं, पण खराब व्यवस्थापनामुळे या कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांना प्राण गमवावे लागले.
बंगळुरू : 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव केला, यानंतर आरसीबीच्या जगभरातल्या चाहत्यांनी जल्लोष केला, पण आरसीबीसाठी हा जल्लोष फार काळ टिकू शकला नाही. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीने चाहत्यांना हा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बोलावलं, यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं, पण खराब व्यवस्थापनामुळे या कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांना प्राण गमवावे लागले.
विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदार यांच्यासह आरसीबीचे इतर खेळाडू आयपीएल ट्रॉफीसह बंगळुरूला पोहोचले, पण कोणत्याही नियोजनाशिवाय झालेल्या या कार्यक्रमात अचानक लाखो लोकांचा जमाव पोहोचला आणि स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले. या खराब आयोजनाबद्दल आरसीबीवर जगभरातून टीकेचा सामना करावा लागला. चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर आरसीबीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकही पोस्ट टाकण्यात आली नव्हती, पण आता 3 महिन्यांनंतर आरसीबीने मौन सोडलं आहे. चाहत्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी RCB CARES लॉन्च करत असल्याची घोषणा केली आहे.
advertisement
Dear 12th Man Army, this is our heartfelt letter to you!
view commentsLocation :
Bangalore,Karnataka
First Published :
August 28, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बंगळुरू चेंगराचेंगरीच्या 3 महिन्यांनंतर RCB ला जाग आली, 11 मृत्यूंबाबत काय म्हणाली विराटची टीम?


