'रायजिंग स्टार'च्या डोक्यात हवा गेली! RCB च्या खेळाडूचं घाणेरडं सेलिब्रेशन, वादग्रस्त Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
क्रिकेटच्या मैदानात खेळाडू सेलिब्रेशन करताना काही वेळा मर्यादा ओलांडतात, ज्यामुळे मोठा वाद निर्माण होतो. आरसीबीच्या युवा खेळाडूच्याबाबतीतही असंच काही घडलं आहे.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात खेळाडू सेलिब्रेशन करताना काही वेळा मर्यादा ओलांडतात, ज्यामुळे मोठा वाद निर्माण होतो. आरसीबीच्या युवा खेळाडूच्याबाबतीतही असंच काही घडलं आहे. शतक ठोकल्यानंतर या खेळाडूने केलेलं सेलिब्रेशन वादात सापडलं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातव्या क्रमांकावर बॅटिंग करताना या खेळाडूने शतकानंतर अस्लिल सेलिब्रेशन केलं. त्रिपुरा आणि कर्नाटक यांच्यातल्या सामन्यात त्रिपुराचा खेळाडू स्वप्निल सिंग याने शतकानंतर घाणेरडे इशारे केले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
स्वप्निल सिंग याला आरसीबीने आयपीएल 2026 साठी रिटेन केलं आहे. स्वप्निलने त्याची ओळख बॉलर म्हणून बनवली आहे, पण कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याने बॅटने छाप पाडली. स्वप्निल सिंगने 93 बॉलमध्ये 100 रन केले, ज्यात 7 फोर आणि सिक्सचा समावेश होता.
advertisement
लिस्ट ए करिअरचं पहिलं शतक
कर्नाटकने पहिले बॅटिंग करताना देवदत्त पडिक्कलच्या 108 रनच्या जोरावर त्रिपुराला 333 रनचं आव्हान दिलं, या आव्हानाचा पाठलाग करताना त्रिपुराची अवस्था 59/5 अशी झाली. यानंतर स्वप्निल सिंगने इनिंग सावरून लिस्ट ए करिअरमधलं त्याचं पहिलं शतक ठोकलं. या शतकानंतर स्वप्निल सिंगने केलेलं सेलिब्रेशन वादात सापडलं आहे.
advertisement
शतकानंतर झाला आऊट
शतक ठोकल्यानंतर स्वप्निल सिंग लगेचच आऊट झाला. विजयकुमार वैश्यकने 100 रनवर स्वप्निलला बोल्ड केलं. स्वप्निलची विकेट जाताच त्रिपुराच्या शेवटच्या आशाही संपुष्टात आल्या आणि त्यांचा 49 ओव्हरमध्ये 252 रनवर ऑलआऊट झाला, याचसोबत कर्नाटकने हा सामना 80 रननी जिंकला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 7:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'रायजिंग स्टार'च्या डोक्यात हवा गेली! RCB च्या खेळाडूचं घाणेरडं सेलिब्रेशन, वादग्रस्त Video










