VIDEO : कोण आहे 'ती' मुलगी, जिला श्रेयस इतका भाव देतोय, मागे वळला, डोळा मारला,चाललंय काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यरसोबत एक मुलगी देखील व्हिडिओत स्पॉट झाली आहे.या मुलीला श्रेयस अय्यर मागे वळून पाहतो आहे
Shreyas Iyer Viral Video : टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरची न्यूझीलंड विरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. या निवडीनंतर श्रेयस अय्यर प्रचंड खूश आहे.या दरम्यान श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यरसोबत एक मुलगी देखील व्हिडिओत स्पॉट झाली आहे.या मुलीला श्रेयस अय्यर मागे वळून पाहतो आहे आणि शेवटी डोळा मारताना दिसतं आहे.त्यामुळे श्रेयस अय्यरचं इतकं प्रेम उतू का होतेय आणि ती तरूणी कोण आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच श्रेयस अय्यर मागे वळतो,त्याच्या मागे एक तरूणी देखील चालताना दिसत आहे. या तरूणीला तो अनेक वेळ पाहताना दिसत आहे.विशेष म्हणजे श्रेयसला आपल्याकडे बघता पाहून हसत चालली आहे.
Who is she that Shreyas Iyer is giving so much attention to? 😄
And that wink Sarpanch saab gave to the fans at the end — ohhooo… hooo!
Didn’t know he had that talent too 😉 pic.twitter.com/AiZK735sfk
— Jara (@JARA_Memer) January 4, 2026
advertisement
त्यानंतर चाहत्यांच्या गराड्यात श्रेयस अय्यर सापडताना दिसतो. या दरम्यान त्याच्यासमोर पापाराझी देखील असतात, त्यामुळे तो त्यांना डोळ्या मारून आता बस्स झालं असं सांगत निघून जातो. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओतल्या तरूणीची माहिती मिळू शकलेली नाही. पण श्रेयस अय्यर तिच्याकडे पाहत असल्यामुळे ती चर्चेत आली आहे.
advertisement
श्रेयसला घातली अट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झालं आहे. स्प्लीनच्या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं, मात्र आता संघात स्थान मिळालं असलं तरी श्रेयस अय्यरला एक अट घालण्यात आली आहे.
टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या श्रेयस अय्यरला टीममध्य़े घेण्यासाठी बीसीसीआयने आपले नियम कायम ठेवले अन् त्याला अट घातली आहे. श्रेयस अय्यरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली मॅच फिटनेस सिद्ध करावी लागेल. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस (COE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच तो 11 जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होणाऱ्या मालिकेत खेळू शकणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 7:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : कोण आहे 'ती' मुलगी, जिला श्रेयस इतका भाव देतोय, मागे वळला, डोळा मारला,चाललंय काय?










