RCB Released : विराटने बकासूर ओळखला! रजतने लगेच रिलीज केला 8.75 कोटींचा 'आयत्या बिळावरचा नागोबा'

Last Updated:

IPL 2026 RCB Released List : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकूण 17 खेळाडूंना रिटेन केले आहे, ज्यामध्ये 6 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. संघाने आत्तापर्यंत एकूण 108.60 कोटी रुपये खर्च केले आहेत.

RCB Released liam livingstone
RCB Released liam livingstone
IPL 2026 RCB Released List : आगामी आयपीएल सिझनच्या मिनी लिलावापूर्वी सर्व संघांनी त्यांचे रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अशातच डिफेन्डिंग चॅम्पियन आरसीबीने देखील आपल्या संघात सुधारणा करण्यासाठी 8 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली रजत पाटीदारने 8.75 कोटींच्या खेळाडूची संघातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आरसीबीने आयत्या बिळावरचा नागोबा उठवला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बिनकामाचा खेळाडू रिलीज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकूण 17 खेळाडूंना रिटेन केले आहे, ज्यामध्ये 6 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. संघाने आत्तापर्यंत एकूण 108.60 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्याकडे अजून 16.40 कोटी रुपये शिल्लक (Cap remaining) आहेत. अशातच आता आरसीबीने सर्वात मोठ्या किंमतीचा बिनकामाचा खेळाडू रिलीज केला आहे. त्याचं नाव लियाम लिविंगस्टोन...
advertisement
advertisement

आयत्या बिळावरचा नागोबा

आरसीबीने मागील हंगामात ट्रॉफी उचलली पण यात लिविंगस्टोनचा काडीमात्र संबंध नव्हता. लियाम लिविंगस्टोन याला मागील आयपीएलमध्ये 8.75 कोटींच्या किंमतीत घेतलं होतं. मागील हंगामात त्याने एकूण 10 मॅच खेळल्या, ज्यात त्याच्या बॅटने निराशा केली. त्याने फक्त 112 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा 16 च्या सरासरीने आणि 133.33 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या होता. यामध्ये त्याने फक्त एक फिफ्टी झळकावली होती. तर दोन विकेट्स देखील काढल्या होत्या.
advertisement
RCB ने रिटेन केल्या खेळाडूंची यादी - रजत पाटीदार (कॅप्टन), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह आणि सुयश शर्मा.
RCB ने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी - स्वास्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सीफर्ट, लियाम लिविंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजाराबानी आणि मोहित राठी.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB Released : विराटने बकासूर ओळखला! रजतने लगेच रिलीज केला 8.75 कोटींचा 'आयत्या बिळावरचा नागोबा'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement