Vaibhav Suryavanshi VIDEO : 4 बॉलमध्ये खेळखल्लास,वैभव सूर्यवंशीच्या दांड्या उडवणारा Ritvik Appidi कोण?

Last Updated:

अंडर 19 वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने भारतासमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावा करून स्वस्तात बाद झाला आहे.

ritvik appidi cleans up vaibhav suryavanshi
ritvik appidi cleans up vaibhav suryavanshi
IND U19 vs USA U19, Ritvik Appidi Clean Bowled Vaibhav Suryavanshi : अंडर 19 वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने भारतासमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावा करून स्वस्तात बाद झाला आहे. वैभव सूर्यवंशीला युएसएच्या रित्विक आप्पिडीने (Ritvik Appidi) क्लिन बोल्ड केले होते. त्यामुळे तडाखेबाज खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या दांड्या उडवणारा रित्विक आप्पिडी कोण आहे? अशी चर्चा रंगली आहे.
रित्विक आप्पिडी हा युएस अंडर 19 क्रिकेट संघाचा एक गोलंदाज आहे. तो 25 ऑगस्ट 2008 रोजी जन्मला असून, सध्या त्याचे वय 17 वर्षे आहे.याच रित्विक आप्पिडीने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली आहे. वैभव फक्त 4 बॉलमध्ये 2 धावा करून बाद झाला आहे.












View this post on Instagram























A post shared by ICC (@icc)



advertisement
रित्विकने एक उत्तम लेंथचा बॉल टाकला जो ऑफ स्टंपच्या बाहेर अँगल करत होता. वैभव मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला, पण इनसाइड एज घेऊन स्टंप्सवर आदळली होती.या विकेटनंतर रित्विकने जोरदार सेलीब्रेशन केले होते. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करायला उतरलेला युसएचा डाव हा 107 धावांवर ऑल आऊट झाला होता.युसएकडून नितीश सुदीनीने सर्वाधिक 36 धावा केल्या होत्या.त्याच्या व्यतिरीक्त इतर कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या.दरम्यान युएसचा हा डाव ऑल आऊट करण्यात भारताच्या हेनिल पटेलने मोलाची भूमिका बजावली आहे.भारताकडून हेनिल पटेलने सर्वाधिक 5 विकेट तर दिपेश देवेंद्रन,आरएस अंम्ब्रिश,खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
दरम्यान युएसने दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 ओव्हरमध्ये 21 धावा करून 1 विकेट गमावली आहे. सध्या आयुष म्हात्रे आणि वेदांत त्रिवेदी मैदानात आहेत. तसेच सामन्या दरम्यान पाऊस पडल्याने सध्या खेळ थांबवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi VIDEO : 4 बॉलमध्ये खेळखल्लास,वैभव सूर्यवंशीच्या दांड्या उडवणारा Ritvik Appidi कोण?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement