Rohit Sharma सोबत ओपनिंगला कोण? ऋषभच्या जागी नवख्याला संधी? पाहा कशी असेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs AUS ODI Team Announcement : आशिया कप आणि तीन दिवसांच्या आत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणारा कसोटी कर्णधार शुभमन गिललाही विश्रांतीची आवश्यकता आहे.
Team india For Ind vs Aus ODI : टीम इंडियाचा वनडे कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्यावर चर्चेला उधाण आलं आहे. त्याला कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होत असलेली टीम इंडियाची निवड. 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होणार आहे. अशातच आता सर्वांची नजर टिकलीये ती दोन सुपरस्टारवर... पण रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण येणार? हा प्रश्न कायम राहिला आहे.
अभिषेक शर्मा की यशस्वी जयस्वाल?
आशिया कप आणि तीन दिवसांच्या आत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणारा कसोटी कर्णधार शुभमन गिललाही विश्रांतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत, त्याला एकदिवसीय किंवा टी-२० किंवा दोन्ही सामन्यांमधून विश्रांती दिली जाऊ शकते. त्यानंतर आता रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी दोनच पर्याय उरले आहेत. अभिषेक शर्मा किंवा यशस्वी जयस्वाल... अशातच रोहित यशस्वीसोबत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
नितीश कुमार रेड्डीला संधी?
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जर दुखापतीमुळे किंवा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे वनडे सीरिजसाठी उपलब्ध नसेल, तर नितीश कुमार रेड्डी हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. निवडकर्ते त्याला हार्दिकचा बॅकअप म्हणून पाहत आहेत आणि त्याची ऑलराऊंडर क्षमता (पेस बॉलिंग ऑल-राऊंडर) सध्याच्या संघात फार कमी खेळाडूंकडे आहे. त्याला थेट मुख्य वनडे मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे, कारण बीसीसीआयला टी2-0 वर्ल्ड कपसाठी जलदगती गोलंदाजी करू शकणाऱ्या ऑलराऊंडर खेळाडूंची फळी तयार करायची आहे.
advertisement
यशस्वी जयस्वाल तिसरा सलामीवीर?
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांना ऑस्ट्रेलिया 'ए' (Australia A) विरुद्धच्या वनडे मॅचसाठी इंडिया 'ए' संघात स्थान देण्यात आले आहे. तिलक वर्मा तर संघाचे नेतृत्वही करत आहे. निवडकर्ते त्यांना भविष्यातील वनडे सेटअपसाठी नक्कीच तयार करत आहेत. यशस्वी जयस्वाल हा देखील तिन्ही फॉरमॅटचा महत्त्वाचा भाग बनू शकतो. त्याला तिसरा सलामीवीर (Third Opener) म्हणून वनडे संघात लवकरच संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
जसप्रीत बुमराहचं काय?
दरम्यान, जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये सहभाग घेतल्यामुळे, त्याचा वर्कलोड सांभाळणे निवडकर्त्यांसाठी सर्वात मोठं आव्हान असेल. टी२० वर्ल्ड कप सर्वात महत्त्वाचा असल्यामुळे, बुमराहला वनडे सीरिजमधून पूर्णपणे विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 7:50 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma सोबत ओपनिंगला कोण? ऋषभच्या जागी नवख्याला संधी? पाहा कशी असेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया