मैदानात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, खेळाडू घसरूण पडला अन् मृत्यूच्या दारात पोहोचला; एका चुकीने करिअर धोक्यात
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Slipping On Ground: इंग्लंडमध्ये सामन्यादरम्यान कुत्र्याच्या घाणीत घसरून पडल्याने रग्बीपटू अॅडम लँग गंभीर जखमी झाला आणि संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर क्रीडांगणांवर कुत्र्यांना बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नवी दिल्ली : क्रीडा मैदानावर अनेकदा अनपेक्षित आणि विचित्र घटना घडतात. काही प्रसंग इतके अजब असतात की त्यावर विश्वास ठेवणेही कठीण जाते. इंग्लंडमध्ये टोनडू आरएफसीकडून खेळणाऱ्या रग्बीपटू अॅडम लँग सोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडला. सामन्यादरम्यान तो मैदानावर पडले; मात्र हे साधे पडणे नव्हते. तो कुत्र्याच्या विष्ठेवर घसरून पडला आणि त्यातून गंभीर दुखापत झाली. परिस्थिती इतकी बिघडली की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.
क्रीडा मैदानावर यापूर्वी असा प्रकार क्वचितच घडला असेल. टोनडू आरएफसीने आपल्या सोशल मीडियावर लँग यांच्या दुखापतीचा फोटो शेअर करत या घटनेची माहिती दिली.
कुत्र्याच्या घाणीत पडल्यामुळे अॅडम लँगला गंभीर संसर्ग झाला. त्याच्या कोपराला खरचटले होते. सुरुवातीला ही जखम किरकोळ वाटली आणि त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र काही वेळातच हातात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि संसर्ग झपाट्याने पसरू लागला. त्याला रॉयल ग्लॅमर्गन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासानंतर सांगितले की या संसर्गामागील सर्वात संभाव्य कारण म्हणजे कुत्र्याची घाण होती. या घटनेनंतर टोनडू आरएफसीने स्थानिक प्रशासनाकडे खेळाच्या मैदानांवर कुत्र्यांना पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.
advertisement
या प्रकरणानंतर अॅडम लँगने सांगितले की हा काळ माझ्या दृष्टीने मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता आणि खेळाडूंना अशा समस्यांचा सामना करावा लागू नये. टोनडू क्लबचे अध्यक्ष ग्रॅहम थॉमस यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की पांडी पार्कच्या मैदानांवर वारंवार कुत्र्यांची घाण आढळते, जे अत्यंत निराशाजनक आहे.
ग्रॅहम थॉमस यांच्या मते, जरी 99 टक्के कुत्रे पाळणारे लोक जबाबदार असले तरी उरलेल्या 1 टक्के लोकांच्या निष्काळजीपणामुळे सर्वांची बदनामी होते. त्यांनी सुचवले की ज्या मैदानांवर लहान मुले आणि प्रौढ दररोज सराव करतात, तेथे कुत्र्यांना बंदी घालण्यात यावी. दरम्यान ब्रिजेंड कौन्सिलनेही या घटनेची दखल घेत संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडांगणांवर कुत्र्यांना बंदी घालण्याचा विचार सुरू केल्याचे सांगितले आहे. वेल्समधील काही भागांत अशा प्रकारचे कडक नियम आधीपासूनच लागू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 9:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मैदानात काळजाचा ठोका चुकवणारी घटना, खेळाडू घसरूण पडला अन् मृत्यूच्या दारात पोहोचला; एका चुकीने करिअर धोक्यात





