IND vs PAK : राऊफ-फरहानने आता धोनी-कोहलीला वादात ओढलं, ICC च्या सुनावणीत हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानला मोठी शिक्षा होणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात प्रक्षोभक हावभाव केल्याप्रकरणी बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडू हारिस राऊफ आणि साहिबजादा फरहान याची आयसीसीकडे तक्रार केली.
दुबई : आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात प्रक्षोभक हावभाव केल्याप्रकरणी बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडू हारिस राऊफ आणि साहिबजादा फरहान याची आयसीसीकडे तक्रार केली. बीसीसीआयच्या या तक्रारीवर आयसीसीने सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये हारिस राऊफ आणि साहिबजादा फरहान यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार फरहानने भारतीय खेळाडू विराट कोहली आणि एमएस धोनीचंही नाव घेतलं आहे. याआधीही खेळाडूंनी सेलिब्रेशन करताना बंदुकीच्या गोळीबाराचे हावभाव केल्याचं फरहानने म्हटले आहे. तसंच अशाप्रकारे पख्तून जमातीमध्ये सेलिब्रेशन करण्याचा हा पारंपारिक मार्ग असल्याचा दावाही फरहानने केला आहे.
राऊफला होणार दंड
पीटीआयच्या वृत्तनुसार रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान अपमानास्पद भाषा आणि आक्रमक हावभाव केल्याप्रकरणी हारिस राऊफला दंड ठोठावण्यात येणार आहे. पाकिस्तानी टीमच्या हॉटेलमध्ये मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीवेळी दोन्ही खेळाडू वैयक्तिकरित्या हजर झाले, तसंच त्यांच्यासोबत टीमचे मॅनेजर नवीद अक्रम चीमाही होते, पण त्यांचं उत्तर लेखी स्वरुपात होते. दोघांनाही दंड होण्याची शक्यता आहे, तसंच त्यांना डिमेरिट पॉइंट्स दिले जातील, पण दोघांपैकी कुणावरही बंदी घालण्यात येणार नाही, असं स्पर्धेतील एका सूत्राने पीटीआयला सांगितलं आहे.
advertisement
बीसीसीआयने बुधवारी आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे दोघांवर चिथावणीखोर हावभाव केल्याचा आरोप केला होता. संजू सॅमसनच्या विकेटनंतर रौफने विमान पाडल्याचे हावभाव करत सेलिब्रेशन केलं. तसंच बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना त्याने 6-0 आणि विमान पाडल्याचे हावभाव भारतीय प्रेक्षकांकडे पाहून केले.
मे महिन्यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पाकिस्तानने भारताची 6 राफेल पाडल्याचा निराधार दावा केला. या खोट्या दाव्याचा आधार घेऊनच हारिस राऊफने चिथावणी दिली. तर फरहानने या सामन्यात अर्धशतक झळकावून बॅटचा बंदुकीसारखा वापर केला. धोनी आणि कोहली यांनीही याआधी असे हावभाव केल्याचा दाखला फरहानने दिला. धोनीने 2005 साली जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याचं वनडे शतक झळकावलं, त्यानंतर त्याने बॅटने बंदूक चालवत असल्याचं सेलिब्रेशन केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 6:18 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : राऊफ-फरहानने आता धोनी-कोहलीला वादात ओढलं, ICC च्या सुनावणीत हाय व्होल्टेज ड्रामा, पाकिस्तानला मोठी शिक्षा होणार!