Sania Mirza : 'मी थरथर कापत होते...', शोएब मलिकसोबत घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला आला होता पॅनिक अटॅक, भारतातून कुणी केली मदत?

Last Updated:

Sania Mirza Panic Attack : सानियाच्या धैर्याचे कौतुक करताना फराह खान म्हणाली की, सिंगल मदर असण्यापेक्षा अधिक कठीण काही नाही.

Sania Mirza Opens Up About farah khan
Sania Mirza Opens Up About farah khan
Sania Mirza Opens Up On Divorce : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत भारताची स्टार टेनिसपटून सानिया मिर्झा हिने लग्न केलं होतं. मात्र, शोएब मलिक याने तिसरं लग्न केल्यानंतर सानियाने घटस्फोट घेतला आहे. अशातच सानिया मिर्झा हिने नुकतेच तिच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी आणि भावनिक संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. विशेषतः शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सिंगल मदर म्हणून मुलगा इझहानला 'नॉर्मल' बालपण देण्यासाठी ती करत असलेला संघर्ष आणि या काळात तिला आलेले अनुभव तिने सांगितले. त्यावेळी तिने मोठा खुलासा देखील केला आहे.

सानियाला आला होता 'पॅनिक अटॅक'

सानियाने एका क्षणाला तिला आलेला 'पॅनिक अटॅक' आणि त्या वेळची तिची अवस्थाही व्यक्त केली. फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खानसोबतच्या एका खास संवादात सानियाने तिच्या 'सिंगल मदरहुड'च्या आव्हानांवर भाष्य केलं. एकट्या पालकासाठी मुलांना सांभाळणं अवघड असतं, असं सानिया म्हणाली.

सिंगल मदरचा खूपच अवघड प्रवास

advertisement
सानियाच्या धैर्याचे कौतुक करताना फराह खान म्हणाली की, सिंगल मदर असण्यापेक्षा अधिक कठीण काही नाही. हा खूपच अवघड प्रवास आहे. आपल्या सर्वांची स्वतःचा प्रवास असतो आणि आपल्याला आपल्यासाठी सर्वोत्तम असेल तेच निवडावं लागतं. सानियाने मान्य केलं की, मदरहुड, काम आणि बाकीचे आयुष्य यात संतुलन राखणे तिच्यासाठी खूप कठीण होतं.

सानिया अक्षरशः थरथर कापत होती

advertisement
कठीण दिवसांची आठवण सांगताना सानिया म्हणाली की, एका निराशाजनक क्षणी तिला 'पॅनिक अटॅक' आला होता आणि ती अक्षरशः थरथर कापत होती. मी कॅमेऱ्यावर याचा उल्लेख करू इच्छित नाही, पण तू माझ्या सेटवर आलीस आणि त्यानंतर मला एका 'लाइव्ह शो'मध्ये जायचे होते. जर तू तिथे नसतीस, तर मी तो शो केला नसता, असं फराह खानशी बोलताना सानिया मिर्झाने सांगितलं. न्यूज 18 ला दिलेल्या दुसऱ्या एका इंटरव्यूमध्ये सानियाने मोठा खुलासा केला.
advertisement

मलाही भीती वाटली होती...

दरम्यान, 'काहीही झाले तरी, तू हा शो करत आहेस,' असं फरानने मला सांगितलं, अशी आठवण सानियाने सांगितली. फराहने देखील तो प्रसंग आठवला आणि 'पॅनिक अटॅक' पाहून तिला भीती वाटल्याचं मान्य केलंय. मला देखील सानियाची परिस्थिती पाहून भीती वाटली होती, असंही फराह खानने म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sania Mirza : 'मी थरथर कापत होते...', शोएब मलिकसोबत घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला आला होता पॅनिक अटॅक, भारतातून कुणी केली मदत?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement