W,W,W,W,W,W... कॅप्टन रोहितने शोधलेल्या हिऱ्याचा वादळी स्पेल, भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतातील देशांतर्गत टी-20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतिहास घडला आहे. 27 वर्षांच्या डावखुऱ्या फास्ट बॉलरने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतला सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.
मुंबई : भारतातील देशांतर्गत टी-20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतिहास घडला आहे. 27 वर्षांच्या डावखुऱ्या फास्ट बॉलरने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतला सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या मोहम्मद अर्शद खानने मध्य प्रदेशकडून खेळताना चंडीगढविरुद्ध विक्रमाला गवसणी घातली आहे. मोहम्मद अर्शद खानने त्याच्या स्पेलमध्ये 6 विकेट घेतल्या.
कोलकात्याच्या जाधवपूर युनिव्हर्सिटी ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात अर्शद खानने 4 ओव्हर टाकल्या यात त्याने फक्त 6 रन दिले. अर्शद खानच्या या स्पेलमधली एक ओव्हर मेडन होती. टी-20 क्रिकेटमध्ये खूप कमीवेळा एखादा बॉलर मेडन ओव्हर टाकतो. या कामगिरीसोबतच अर्शद खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नवीन विक्रम केला.
• Madhya Pradesh's Arshad Khan bowled the best bowling figures in Syed Mushtaq Ali Trophy history:
• 6 wickets for 9 runs against Chandigarh pic.twitter.com/xumYbIt2wv
— All Cricket Records (@Cric_records45) December 6, 2025
advertisement
अर्शदने मोडलं 2 वर्ष जुनं रेकॉर्ड
अर्शद खानने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 2 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडित काढला आहे. याआधी हैदराबादच्या टी रवी तेजाने 2023 साली छत्तीसगडविरुद्ध 13 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. रवी तेजाशिवाय गुजरातच्या अर्जन नागवासवालाने 2023 मध्येच रेल्वेविरुद्ध 13 रन देऊन 6 विकेट मिळवल्या होत्या, पण आता अर्शद खानने हा रेकॉर्ड मोडला आहे. अर्शद खान हा आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला, पण रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याने 2023 साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
advertisement
मध्य प्रदेशचा विजय
अर्शद खानच्या या वादळी स्पेलमुळे मध्य प्रदेशने चंडीगढवर 7 विकेटने विजय मिळवला. पहिले बॅटिंग करणाऱ्या चंडीगढने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 134 रन केले. या आव्हानाचा पाठलाग मध्य प्रदेशने 14 ओव्हरमध्ये 3 विरेट गमावून केला. हर्ष गवळीने 40 बॉलमध्ये 74 रनची खेळी केली, तर हरप्रीत सिंगने 30 बॉलमध्ये 48 रन करून मध्य प्रदेशचा विजय निश्चित केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 7:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
W,W,W,W,W,W... कॅप्टन रोहितने शोधलेल्या हिऱ्याचा वादळी स्पेल, भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडला!


