Borivali Nashik Bus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक- बोरिवली प्रवास सुसाट; ST च्या AC बसचं नवं टाइमटेबल, तिकीट दर जाणून घ्या

Last Updated:

Borivali Nashik New MSRTC Bus Service Timetable Ticket Price: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पश्चिम मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतूक क्षेत्रातील वाढते प्रदुषण कमी करण्याच्या आणि प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्याच्या उ‌द्देशाने नाशिक ते बोरिवली दरम्यान अत्याधुनिक इलेक्ट्रिक एसी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

Borivali Nashik Bus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक- बोरिवली प्रवास सुसाट; ST च्या AC बसचं नवं टाइमटेबल, तिकीट दर जाणून घ्या
Borivali Nashik Bus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक- बोरिवली प्रवास सुसाट; ST च्या AC बसचं नवं टाइमटेबल, तिकीट दर जाणून घ्या
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पश्चिम मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहतूक क्षेत्रातील वाढते प्रदुषण कमी करण्याच्या आणि प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्याच्या उ‌द्देशाने, नाशिक विभागामार्फत गुरुवार, दिनांक 04-12-2025 पासून समृद्धी महामार्गावरून नाशिक (Nashik) ते बोरिवली (Borivali) दरम्यान अत्याधुनिक इलेक्ट्रिक एसी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
या नवीन सेवेमुळे मुंबई (बोरिवली) आणि नाशिक दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी मिळाली आहे. ही बससेवा पर्यावरणपूरक सेवेकडे वाटचाल करताना दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण 65 इलेक्ट्रिक बसेस आपल्या प्रवासी सेवेत समाविष्ट केल्या आहेत. या बसेस नाशिक- बोरीवली, नाशिक- छत्रपती संभाजीनगरसह इतर प्रमुख मार्गावर सेवा देत आहेत.
advertisement
बोरिवली-नाशिक मार्गावर गुरुवार, दिनांक 04-12-2025 पासून नवीन फेऱ्या सुरू होत आहेत. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर केला जात आहेत. सुरु करण्यात आलेल्या नवीन फेऱ्या गुरुवार, दिनांक 04-12-2025 पासून सुरू होत आहे. एकूण 22 फेऱ्या होणार आहेत. नाशिक बोरिवली मार्गावर 11 फेऱ्या येऊन आणि जाऊन अशा एकूण 22 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
बोरिवली- नाशिक मार्गावर, सकाळी 05:00, 07:00, 08:00, 09:00, 10:00, 11:00, दुपारी 12:30, 01:30, 02:30, 03:30 आणि सायंकाळी 05:00 अशा वेळी बोरिवली बस स्थानकावरून बस धावणार आहे. बससाठी पूर्ण तिकिट 509 रूपये असेल आणि महिलांसाठी 266 रूपये तिकिट असणार आहे. महिलांसाठी बसचं तिकिट अर्धेच असेल. नाशिक- बोरिवली मार्गावर, सकाळी 05:00, 07:00, 08:00, 09:00, 10:00, दुपारी 12:30, 01:30, 02:30, 03:30 सायंकाळी 04:30 आणि 05:30 अशा वेळी नाशिक बस स्थानकावरून बस धावणार आहे. बससाठी पूर्ण तिकिट 509 रूपये असेल आणि महिलांसाठी 266 रूपये तिकिट असणार आहे. महिलांसाठी बसचं तिकिट अर्धेच असेल.
advertisement
महत्त्वपूर्ण सेवेचे उ‌द्घाटन नाशिकचे जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद (I.A.S.) यांच्या हस्ते उ‌द्घाटन पार पडले. यावेळी विजय गिते, प्रादेशिक व्यवस्थापक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक प्रदेश- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उपरोक्त बस फेऱ्या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर ऑनलाईनसाठी व MSRTC mobile reservation app वर आगाऊ आरक्षणाला उपलब्ध आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आधुनिक, शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Borivali Nashik Bus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक- बोरिवली प्रवास सुसाट; ST च्या AC बसचं नवं टाइमटेबल, तिकीट दर जाणून घ्या
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement