Shafali Verma : टीम इंडियातून हकालपट्टी, वडिलांना हृदयविकाराचा झटका! एका फोनने बदललं खचलेल्या 'लेडी सेहवाग'चं नशीब
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shafali Verma father gets heart attack :पहिल्या बॉलपासून जबरदस्त फटके मारण्यात सक्षम असलेल्या शेफालीने गोलंदाजांमध्ये भीती निर्माण केली, परंतु तिच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे तिला संघातून वगळण्यात आलं.
Shafali Verma in World Cup final : वनडे वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम मॅचमध्ये टीम इंडियाची युवा आणि विस्फोटक ओपनर शफाली वर्माने आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने इतिहास रचला. शेफालीने साऊथ आफ्रिकेविरुद्ध केवळ 78 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 87 धावांची धडाकेबाज खेळी केली. स्मृती मंधानासोबत तिने 104 धावांची पार्टनरशिप करत टीम इंडियाला 298 धावांच्या मोठ्या टोटलचा मजबूत स्टार्ट मिळवून दिला. तर बॉलिंगमध्ये 7 ओव्हरमध्ये फक्त 36 रन्स देत 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र, तुम्हाला माहितीये का? याच शेफाली वर्माची टीम इंडियातून हकालपट्टी करण्यात आली होती.
वीरेंद्र सेहवागशी तुलना पण...
जेव्हा शेफाली वर्माने भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं, तेव्हा तिच्या आक्रमक फलंदाजीची तुलना वीरेंद्र सेहवागशी केली जात होती. तिला लेडी सेहवाग अशी उपमा दिली जात होती. पहिल्या बॉलपासून जबरदस्त फटके मारण्यात सक्षम असलेल्या शेफालीने गोलंदाजांमध्ये भीती निर्माण केली, परंतु तिच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे तिला संघातून वगळण्यात आलं. शेफालीला तिचा लय कायम ठेवता आला नाही आणि तिचा फॉर्म घसरला. शेफालीला चांगली सुरूवात मिळूनही मोठी खेळी करता आली नाही.
advertisement
वडिलांना हृदयविकाराचा झटका
2024 मध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होती. शेफालीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार होता. मात्र, बॅड न्यूज आली. शेफालीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं. शफालीसाठी हा काळ सोपा नव्हता, कारण तिच्या वडिलांना संघातून वगळण्याच्या फक्त दोन दिवस आधी हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, शेफालीने हे तिच्या वडिलांपासून लवपून ठेवलं आणि एका आठवड्यानंतर त्यांना सांगितलं की ती संघातून ड्रॉप झाली आहे. वडिलांना झालेला त्रास पाहून शेफाली खचून गेली.
advertisement
वर्ल्ड कप स्कॉडमधून डच्चू
शेफालीला संघातून वगळण्यात आल्याने आणि नंतर तिच्या वडिलांच्या हृदयविकाराने शफालीला खूप त्रास झाला, परंतु तिने हार मानली नाही आणि स्थानिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी कठोर परिश्रम केलं. तिने केवळ तिचा फॉर्म परत मिळवला नाही तर तिची फिटनेस देखील सुधारली. शेफालीने तिचं वजन कमी केलं. परंतू तरीही पदरी निराशा आली. शेफालीला वर्ल्ड कप स्कॉडमध्ये टीम इंडियात संधी मिळाली नाही. एवढंच काय तर रिझर्व स्कॉडमध्ये देखील शेफालीला संधी मिळाली नाही.
advertisement
शेफालीला बीसीसीआयकडून फोन
आता आपलं करियर संपलं असं तिला वाटू लागलं. पण चमत्कार घडला. शेफालीला बीसीसीआयकडून फोन आला अन् थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळाली. प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्याने शेफालीला बॅग पॅक करण्याची ऑर्डर मिळाली. शेफाली थेट नवी मुंबईत पोहोचली ती सेमीफायनल खेळण्यासाठीच... शेफाली वर्माने सेमीफायनलमपध्ये पुन्हा माती खाल्ली. त्यामुळे फायनलमध्ये तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवतील की नाही? असा सवाल होता. शेफालीने फायनलमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली अन् वर्ल्ड कप आपल्या ऑलराऊंडर कामगिरीने जिंकवून दिला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shafali Verma : टीम इंडियातून हकालपट्टी, वडिलांना हृदयविकाराचा झटका! एका फोनने बदललं खचलेल्या 'लेडी सेहवाग'चं नशीब


