3 वर्षांची मेहनत, एका गाण्यानं बदललं नशीब, I'm Done मुळे रातोरात स्टार बनलेला हा तरुण कोण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मान पनु याचं I’m Done गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. सलमान खाननेही कौतुक केलं. उत्तराखंडच्या या २५ वर्षीय गायकाने संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.
'कल रात मेरे घर आया एक चोर', या गाण्यानंतर आता सोशल मीडियावर एक गाणं रातोरात फेमस झालं, इतकं की सगळे सेलिब्रिटी त्या गाण्यावर रिल्स करत आहे. युट्यूबर्स त्या गाण्याचे फिमेल व्हर्जन करत आहेत. अवघ्या 25 वर्षांच्या तरुणानं लिहिलेलं आणि गायलेलं हे गाणं अक्षरश: काही तासांत इतकं व्हायरल झालं की जगभरात ट्रेण्ड होत आहे. हा तरुण कोण आणि इतकी चर्चा का होत आहे त्याची कहाणी जाणून घेऊया.
advertisement
२५ वर्षीय हा गायक सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण, त्याचा एक गाणे ऐकून सुपरस्टार सलमान खान इतका खूश झाला की त्याने हे गाणे आपले असावे अशी इच्छा व्यक्त केली. १ नोव्हेंबर रोजी सलमान खानने आपल्या पनवेलच्या फार्महाऊसवरून इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत, सलमान खानने तरुणाच्या गाण्याचे भरभरून कौतुक केलं.
advertisement
सलमाननं देखील त्याचं कौतुक करत आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "खूप दिवसांनी एक अप्रतिम गाणे ऐकलं... अभिनंदन! हे गाणे माझं असावं अशी इच्छा आहे.. @maanpanu_". अप्रत्यक्षपणे, सलमान खानने गायक मान पानूच्या हिट गाण्याचा उल्लेख करत त्याचे कौतुक केले. सलमान खानकडून मिळालेल्या या अनपेक्षित कौतुकावर मान पानूनेही त्वरित प्रतिक्रिया दिली. त्याने कमेंटमध्ये 'Now I’m Done' अशी कमेंट केली आहे.
advertisement
advertisement
[caption id="attachment_1520374" align="alignnone" width="602"] त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्याने मार्च ते डिसेंबर २०२२ या काळात 'हाइटेक प्रोऑडिओ इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये मार्केटिंगमध्ये काम केलं आहे. मानचा संगीताचा प्रवास सुमारे तीन वर्षांपूर्वी मुंबईतील फर स्टुडिओमध्ये सहाय्यक संगीत निर्माता म्हणून सुरू झाला.</dd>
<dd>[/caption]
advertisement
advertisement


