Shikhar Dhawan : 'गब्बर'ची जागा कोण घेणार? भारतीय संघाचा 'मिस्टर ICC' होणं नाही सोपं

Last Updated:

38 वर्षांचा 'गब्बर' उर्फ शिखर धवनला मिस्टर आयसीसी म्हणूनही ओळखलं जातं. तो आपल्या कारकिर्दीत 250 हून अधिक मॅचेस खेळला.

News18
News18
दिल्ली : दीर्घ काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या शिखर धवनने काल आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. टीम इंडियाचा स्टार आणि स्फोटक ओपनर अशी त्याची ओळख होती. शिवाय, मैदानावर 'कबड्डी स्टाइल'मध्ये सेलिब्रेशन करण्याची त्याची पद्धत आता 'ट्रेडमार्क स्टाइल' बनली आहे. 38 वर्षांचा 'गब्बर' उर्फ शिखर धवनला मिस्टर आयसीसी म्हणूनही ओळखलं जातं. तो आपल्या कारकिर्दीत 250 हून अधिक मॅचेस खेळला असून, त्यांमध्ये त्याने 10,000 हून अधिक रन्स केले आहेत.
क्रिकेटला रामराम करताना त्याने आपलं कुटुंब, बालपणीचे कोच, टीम इंडिया आणि बीसीसीआयचे आभार मानले. 2010 साली टीम इंडियामध्ये दाखल झालेल्या या क्रिकेटपटूची कारकीर्द चांगली बहरली होती; पण अनेक प्रसंगी नशिबाने त्याला साथ दिली नाही; मात्र त्याने कधीच कॅप्टन, टीम मॅनेजमेंट आणि इतरांना दोष दिला नाही. जेव्हा जेव्हा त्याला टीममधून वगळण्यात आलं तेव्हा त्याने तक्रार न करता आनंदाने निर्णय स्वीकारला. धवन हा मैदानावरच्या सर्वांत मनोरंजक क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अल्पावधीतच तो भारतीय क्रिकेट सेटअपचा मुख्य आधार बनला होता.
advertisement
आयुष्यात पुढे जाण्याची वेळ, धवन भावुक
गेल्या काही वर्षांत, तो सर्व फॉरमॅटमध्ये भारताच्या अनेक विजयांचा अविभाज्य भाग होता. धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. व्हिडिओ पोस्टमध्ये धवन म्हणाला, "मी अनेक आठवणींसह माझ्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवट करत आहे. आयुष्यात पुढे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. जय हिंद."
advertisement
टीम इंडियाचा 'मिस्टर आयसीसी'
धवन पुढे असंही म्हणाला, की "मी आता भारतासाठी खेळू शकणार नाही याचं दु:ख करत बसण्यापेक्षा मी इतका काळ भारतासाठी खेळलो याचा मला आनंद वाटतो. या प्रवासासाठी मी माझं कुटुंब, माझे बालपणीचे कोच, माझे सहकारी खेळाडू आणि सर्व चाहत्यांचा आभारी आहे." विशेषत: आयसीसी स्पर्धांमध्ये धवनचा दबदबा होता. या स्पर्धांमधल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याला 'मिस्टर आयसीसी' म्हटलं जाई. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 आणि 2017मध्ये गोल्डन बॅट जिंकली होती. त्याच्याबद्दल असं म्हटलं जात असे, की तो फॉर्ममध्ये असो किंवा नसो, आयसीसी स्पर्धेत तो निश्चितपणे रन्स करतो. अनेक दिग्गज बॅट्समननी यापूर्वी अनेकदा याचा उल्लेख केला आहे.
advertisement
सचिन कोहलीला जमलं नाही ते धवनने केलं
शिखर धवनच्या नावावर असा विक्रम आहे, जो सचिन-कोहलीच्या नावावरदेखील नाही. धवन हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. तो 34 टेस्ट मॅचेस खेळला असून, 58 इनिंग्जमध्ये 40.61 च्या सरासरीने त्याने 2315 रन्स केले आहेत. 167 वन-डे मॅचेसमध्ये 44.11 च्या सरासरीने त्याने 6793 रन्स केले असून, 68 टी-20 मॅचेसमध्ये 1759 रन्स केले आहेत.
advertisement
क्रिकेटमध्ये २४ शतकं आणि ५५ अर्धशतकं
धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24 शतकं आणि 55 अर्धशतकं झळकावली आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 शतकं आणि 39 अर्धशतकांची नोंद आहे,. टेस्ट क्रिकेटध्ये त्याने 7 शतकं आणि 5 अर्धशतकं केली आहेत. त्याने टी-20मध्ये 11 अर्धशतकं झळकवली आहेत. धवनची खेळी भविष्यातल्या क्रिकेटपटूंना प्रेरणा देत राहील. त्याचं खेळातलं योगदान चाहते, संघातले सहकारी आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या स्मरणात राहील. धवनच्या निवृत्तीची घोषणा म्हणजे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी एका युगाचा अंत आहे, असं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shikhar Dhawan : 'गब्बर'ची जागा कोण घेणार? भारतीय संघाचा 'मिस्टर ICC' होणं नाही सोपं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement