ना बँड बाजा, ना फटाके, ना डान्स; ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप ट्रॉफिचं मनाला न पटण्यासारखं स्वागत, पाहा Video
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतासाठी सर्वस्व असलेल्या या ट्रॉफीचं ऑस्ट्रेलियामध्ये अशापद्धतीनं स्वागत होणं काही पटलं नाही... WATCH Video
मुंबई, 22 नोव्हेंबर : भारतात काही दिवसांपूर्वी क्रिकेटचे वारे वाहात होते. जे रविवारी फॅनलनंतर अखेर संथावलं. कारण या वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच न हारलेली टीम इंडयाने अखेर ऑस्ट्रोलियासमोर आपले गुडघे टेकले होते. ज्यामुळे 2023ची वर्ल्ड कप ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या नावे झाली.
मॅच हरल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या कारण क्रिकेट म्हणजे भारतासाठी एक खेळ नाही तर त्यांच्या भावना आहे. ज्यासाठी अनेक भारतीय वेडे आहेत. याचं उदाहरण देखील आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. भारत मॅच जिंकावी यासाठी अनेकांनी हजारो रुपयांचे तिकीट काढून मॅच पाहिली तर काहींनी अगदी देवाला पाण्यात ठेवलं. काहींनी तर देवाची पूजा, होम हवन केलं. पण असं सगळं करुन देखील भारत ही मॅच हारली.
advertisement
ट्रॉफी भारताची झाली नाही म्हणून अनेकांच्या भावना दुखावल्या कारण ती ट्रॉफी भारतासाठी खूपच महत्वाची होती. पण ज्यांच्याकडे ही ट्रॉफी गेली त्या लोकांनी या ट्रॉफी प्रती असलेली इज्ज दाखवून दिली. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मेशल मार्श देखील ट्रॉफिवर पाय ठेवून काढलेल्या फोटोमुळे बराच ट्रोल झाला आहे.
त्यात आला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कॅमिन्स ट्रॉफी घेऊन विमानतळावर पोहोचल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या देशाच वर्ल्ड कप घेऊन पोहोचला तेव्हा त्याचं स्वागत कशा पद्धतीनं झालं हे पाहू शकता. भारतासाठी सर्वस्व असलेली असलेली ट्रॉफी घेऊन जेव्हा पॅट कॅमिन्स त्याच्या देशात गेला तेव्हा तेथे 4 ते 5 स्पोर्ट्स जर्नलिस्ट त्याच्या स्वागतासाठी आले होते. जे फक्त त्याचे फोटो घेत होते. विमानावरील इतर लोकांनी तर या सगळ्याला इग्नोर करत आपली कामे सुरुच ठेवली. ज्यामुळे हा व्हिडीओ बराच चर्चेत आला.
advertisement
भारतासाठी सर्वस्व असलेल्या या ट्रॉफीचं ऑस्ट्रेलीयामध्ये अशापद्धतीनं स्वागत होणं अनेकांना पटलेलं नाही. ज्यामुळे या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. भारताने जर ही ट्रॉफी जिंकली असती तर संपूर्ण देशात उत्साह, जल्लोष आणि दिवाळी साजरी झाली असती. पण ऑस्ट्रेलियात तर कोणी स्वगतासाठी ही आलं नाही ही आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे.
Pat Cummins arrives at an Australian airport. Just a few sports journalists clicking photos and regular passengers minding their own business. Isse zyada log to hamare yaha JCB ki khudaai dekhne ke liye khade ho jaate hain. pic.twitter.com/maq5GBEgnj
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) November 22, 2023
advertisement
हा व्हिडीओ @theskindoctor13 नावाच्या अकाउंटवरुन X वर शेअर करण्यात आला आहे. जो शेअर करताना लिहिलंय, "पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन विमानतळावर पोहोचला. फक्त काही क्रीडा पत्रकार फोटो क्लिक करतात आणि नियमित प्रवासी त्यांच्या स्वतःच्या कामात लक्ष देत असतात. या पेक्षा जास्त लोक तर आपल्याकडे जेसीबी मशीनचं काम सुरु असताना उभे असतात.''
advertisement
हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला. अनेक भारतीय या व्हिडीओला ट्रोल करत आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये तर पूर आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2023 4:11 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ना बँड बाजा, ना फटाके, ना डान्स; ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप ट्रॉफिचं मनाला न पटण्यासारखं स्वागत, पाहा Video