Smriti Mandhana : चेहऱ्याचा रंग उडाला, डोळे खूप काही सांगून गेले, लग्न पोस्टपोन झाल्यानंतर स्मृतीचा पहिला VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लग्न पोस्टपोन झाल्यापासून स्मृती मानधना गेले काही दिवस काहीच बोलली नव्हती. पण आता स्मृती मानधनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृतीच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे तर तिचे डोळे खूप काही सांगून जातायत.
Smriti Mandhana News : टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा म्युझिक कंपोझर पलाथ मुच्छल यांचा लग्न काही दिवसांपूर्वीच पोस्टपोन करण्यात आलं होतं. दोघांच लग्न पुढे ढकलण्यामागे स्मृतीच्या वडील श्रीनिवास मानधना यांना आलेला हार्टअटॅक आणि पलाश मुच्छलचे व्हायरल झालेले चॅट कारण असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये बोलले जात आहे. या सगळ्या घडामोडीवर लग्न पोस्टपोन झाल्यापासून स्मृती मानधना गेले काही दिवस काहीच बोलली नव्हती. पण आता स्मृती मानधनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृतीच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे तर तिचे डोळे खूप काही सांगून जातायत.दरम्यान या व्हिडिओत नेमकी स्मृती मानधना काय म्हणाली आहे? हे जाणून घेऊयात.
पलाश मुच्छल सोबत लग्न पोस्टपोन झाल्याच्या 12 दिवसांनी स्मृती मानधनाने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ पाहून स्मृतीच्या चेहऱ्याचा रंग उडाल्याचे दिसत आहे,त्याचसोबत तिचे डोळे खूप काही सांगून जातायत.एकंदरीत या संपूर्ण घटनेचा तिच्यावर खोलवर परिणाम झाल्याते तिला पाहून समजते आहे.
advertisement
व्हिडिओत काय?
''आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून 12 वर्षे झाली आहेत आणि प्रत्येक वेळी आमचे मन दुखावले जायचे.संपूर्ण वर्ल्डकपमध्ये आम्ही सतत विचार करत होतो की तो क्षण (भारत कधी जिंकेल) कधी येईल.जेव्हा तो क्षण आला तेव्हा मला सतत लहान मुलासारखे वाटायचे, मी जास्त फोटो काढले नाहीत'', असे सांगत स्मृती मानधनाने वर्ल्ड विजयाच्या आठवणी सांगितल्या.
advertisement
तसेच सामन्या दरम्यान मी फलंदाजीबद्दल फारसा विचार केला नाही; मी फक्त संघाला जे हवे होते ते केले.फिल्डींग करताना मला फक्त देवाची आठवण आली.संपूर्ण 300 चेंडूंपर्यंत मी प्रार्थना करत होते, 'याची विकेट मिळाली पाहिजे, त्याची विकेट मिळाली पाहिजे,असे स्मृतीने सांगितले.
खरं तर हा व्हिडिओ एका पेड पार्टनरशीपचा व्हिडिओ होता.या व्हिडिओमध्ये स्मृती मानधना आपल्या वर्ल्ड कप दरम्यानचा अनुभव सांगते आणि कंपनीचं प्रमोशन देखील करते. या व्हिडिओमध्ये तिने लग्न पोस्टपोन झाल्याच्या घटनेवर काही एक प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. पण लग्न पोस्टपोन झाल्याच्या 12 दिवसानंतर तिची ही पहिली पोस्ट आहे. त्यामुळे या पोस्टकडे गांभिर्याने पाहिले जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : चेहऱ्याचा रंग उडाला, डोळे खूप काही सांगून गेले, लग्न पोस्टपोन झाल्यानंतर स्मृतीचा पहिला VIDEO


