स्मॅशिंग स्मृती मंधानाचा विश्वविक्रम, ऑस्ट्रेलियाला चिरडले; सांगलीची मुलगी सचिन, रोहित, विराट सर्वांवर पडली भारी

Last Updated:

Smriti Mandhana Fastest ODI hundred: दिल्लीतील भारत-ऑस्ट्रेलिया महिला एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाने अवघ्या 50 चेंडूत शतक ठोकत इतिहास घडवला. सलग दोन डावांत शतक झळकावून तिने विक्रमांचा पाऊस पाडला.

News18
News18
नवी दिल्ली: दिल्लीतील भारत-ऑस्ट्रेलिया महिला एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मृती मंधानाने पुन्हा एकदा इतिहास रचला. तिने फक्त 50 चेंडूत शतक झळकावले, जे भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले. याआधीच्या दुसऱ्या सामन्यात तिने 77 चेंडूत शतक ठोकले होते. अशा प्रकारे तिने सलग दोन सामन्यांत शतकं झळकावत विक्रम केला.
advertisement
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद 412 धावा केल्या आहे. उत्तरादाखळ भारताने आक्रमक फलंदाजीने उत्तर दिले आहे. यात मंधानाच्या वादळी आणि विक्रमी शतकाचा समावेश आहे. स्मृतीने या सामन्यात 63 चेडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 198.41च्या सरासरीने 125 धावा केल्या.
भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 52 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या होत्या. ही खेळी त्याने 2013 साली जयपूरमध्ये केली होती. आता भारतीय क्रिकेटमध्ये स्मृतीचे नाव सुवर्ण अक्षरात लिहले जाईल. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम स्मृतीच्या नावावर झाला आहे.
advertisement
advertisement
विक्रमांची मालिका
भारतासाठी सर्वात जलद शतकं (ODIमध्ये पुरुष आणि महिला):
50 चेंडूत स्मृती मंधाना (vs ऑस्ट्रेलिया, दिल्ली, 2025)
52 चेंडूत विराट कोहली (vs ऑस्ट्रेलिया, जयपूर, 2013)
advertisement
60 चेंडूत वीरेंद्र सेहवाग (vs न्यूझीलंड, हॅमिल्टन, 2009)
महिला ODI मधील सर्वात जलद शतकं (सर्व संघ):
45 चेंडूत मेग लॅनिंग (vs न्यूझीलंड, 2012)
50 चेंडूत स्मृती मंधाना (vs ऑस्ट्रेलिया, 2025)
advertisement
57 चेंडूत करेन रोल्टन (vs दक्षिण आफ्रिका, 2000)
57 चेंडूत बेथ मुनी (vs भारत, 2025)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व
स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 4 शतकं ठोकली आहेत. हा विक्रम नॅट सिव्हर-ब्रंट (4) आणि टॅमी बोमाँट (4) यांच्या बरोबरीचा आहे. 
advertisement
कॅलेंडर वर्षातील शतकांचा विक्रम
2024 मध्ये – 4 शतकं
2025 मध्ये आधीच 4 शतकं (आणि वर्ष अजून संपलेले नाही)
या कामगिरीमुळे ती ताझ्मिन ब्रिट्स (2025) च्या बरोबरीवर आली आहे.
महिला क्रिकेटमधील शतकांची यादी
मेग लॅनिंग – 15
सुजी बेट्स – 13
स्मृती मंधाना – 13
टॅमी बोमाँट – 12
पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकांची यादी...
धावाचेंडूषटकारचौकारखेळाडूसामनामैदानदिनांक
14931169ए. बी. डिव्हिलियर्सदक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजजोहान्सबर्ग18/01/2015
131*36146सी. जे. अँडरसनन्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिजक्विन्सटाऊन01/01/2014
10237116शाहिद आफ्रिदीपाकिस्तान विरुद्ध श्रीलंकानैरोबी04/10/1996
1064089ग्लेन मॅक्सवेलऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्सदिल्ली25/10/2023
101*41114असीफ खानयूएई विरुद्ध नेपाळकीर्तिपूर16/03/2023
14744108एम. व्ही. बाउचरदक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वेपोटचेस्ट्रूम20/09/2006
11745148ब्रायन लारावेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेशढाका09/10/1999
10245910शाहिद आफ्रिदीपाकिस्तान विरुद्ध भारतकानपूर15/04/2005
10446512जे. डी. रायडरन्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिजक्विन्सटाऊन01/01/2014
116*4698जे. सी. बटलरइंग्लंड विरुद्ध पाकिस्तानदुबई20/11/2015
162*47147जे. सी. बटलरइंग्लंड विरुद्ध नेदरलँड्सआमस्टलव्हीन17/06/2022
118*4776कॅमेरॉन ग्रीनऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकामॅके24/08/2025
134481111सनथ जयसूर्याश्रीलंका विरुद्ध पाकिस्तानसिंगापूर02/04/1996
10649149ए. मार्करमदक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंकादिल्ली07/10/2023
110*5096जे. सी. बटलरइंग्लंड विरुद्ध पाकिस्तानसाउथॅंप्टन11/05/2019
11350812के. जे. ओ'ब्रायनआयर्लंड विरुद्ध इंग्लंडबेंगळुरू02/03/2011
10252104जी. जे. मॅक्सवेलऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंकासिडनी07/03/2015
100*5278विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजयपूर16/10/2013
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्मॅशिंग स्मृती मंधानाचा विश्वविक्रम, ऑस्ट्रेलियाला चिरडले; सांगलीची मुलगी सचिन, रोहित, विराट सर्वांवर पडली भारी
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement