"Supercalifragilisticfantabulous", गावस्करांनी शोधला भला मोठा शब्द, अर्थ सोडा उच्चारही करता येणार नाही! काय म्हणाले लिटल मास्टर?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sunil Gavaskar On Team India Performance : भारतीय संघ हा हरवण्यासाठी अत्यंत कठीण असा एक अभेद्य किल्ला बनला आहे. यावेळी त्यांनी "सुपरकॅलिफ्राजिलिस्टिकफँटाब्युलसली वंडरफुली अमेझिंग" अशा शब्दांचा वापर केला आहे.
Sunil Gavaskar Statement : भारताने न्यूझीलंडविरुद्घची टी-ट्वेंटी सीरिज जिंकली. त्यानंतर भारतीय क्रिकेटचे दिग्गज फलंदाज आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या विजयाने भारावून गेले आहेत. तिसऱ्या टी-ट्वेंटी मॅचमध्ये भारताने ज्या पद्धतीने किवींचा धुव्वा उडवला, त्यानंतर गावस्कर यांनी टीमचे कौतुक केलं. त्यावेळी सुनील गावस्करांनी असा काही शब्द उच्चारला की शशी थरूर यांना देखील त्याचा अर्थ कळाला नसेल.
सुपरकॅलिफ्राजिलिस्टिकफँटाब्युलसली
जिओ हॉटस्टारवरील एका शोमध्ये गावस्कर म्हणाले की, केवळ बॅटिंगच नाही तर बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही भारत चॅम्पियन टीमसारखा खेळला. जगातील प्रत्येक टीम आता असा विचार करत असेल की या टीम इंडियाला रोखायचे कसं? गावस्कर यांच्या मते, सध्याचा भारतीय संघ हा हरवण्यासाठी अत्यंत कठीण असा एक अभेद्य किल्ला बनला आहे. यावेळी त्यांनी "सुपरकॅलिफ्राजिलिस्टिकफँटाब्युलसली वंडरफुली अमेझिंग" अशा शब्दांचा वापर केला आहे.
advertisement
शब्दाचा अर्थ काय?
सुपरकॅलिफ्राजिलिस्टिकफँटाब्युलसली (Supercalifragilisticexpialidocious) हा शब्द प्रामुख्याने एखाद्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो जी अत्यंत उत्कृष्ट, विलक्षण किंवा कल्पनेपलीकडे चांगली आहे. जेव्हा साधे शब्द एखाद्या गोष्टीचे कौतुक करण्यासाठी पुरेसे नसतात, तेव्हा हा लांबलचक शब्द वापरला जातो.
अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले
भारताने 154 रनचं टार्गेट अवघ्या 10 ओव्हरमध्ये गाठून सर्वांनाच चकित केलं. या विजयाचे मुख्य शिल्पकार अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव ठरले, ज्यांनी वादळी हाफ सेंच्युरी झळकावल्या. विशेषतः अभिषेक शर्माने या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय टीम ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे, ते पाहून इतर सर्व टीम्सचे धाबे दणाणले आहेत.
advertisement
वेगवान हाफ सेंच्युरीचा रेकॉर्ड
अभिषेक शर्माच्या खेळीबद्दल बोलताना गावस्करांनी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगचा उल्लेख केला. अभिषेकने ज्या वेगाने हाफ सेंच्युरी पूर्ण केली, त्यावरून तो भविष्यात एखादा मोठा रेकॉर्ड मोडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर त्याने सर्वात वेगवान हाफ सेंच्युरीचा रेकॉर्ड मोडला, तर त्याचा मेंटॉर युवराज सिंग सर्वात आनंदी असेल, असंही गावस्कर यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
दुःख वाटण्याऐवजी अभिमान
दरम्यान, आपला रेकॉर्ड जेव्हा एखादा भारतीय खेळाडूच मोडतो, तेव्हा त्याचे दुःख वाटण्याऐवजी अभिमान वाटतो, असं देखील गावस्कर म्हणाले आणि अभिषेक शर्मावर विश्वास व्यक्त केलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 10:12 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
"Supercalifragilisticfantabulous", गावस्करांनी शोधला भला मोठा शब्द, अर्थ सोडा उच्चारही करता येणार नाही! काय म्हणाले लिटल मास्टर?










