सूर्यकुमार यादव का गिल... आशिया कपसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण? BCCI ने सस्पेन्स संपवला!

Last Updated:

आशिया कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. 19 किंवा 20 ऑगस्टला मुंबईमध्ये निवड समितीची बैठक होईल आणि त्यानंतर आशिया कपसाठी भारतीय टीम जाहीर केली जाईल.

सूर्यकुमार यादव का गिल... आशिया कपसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण? BCCI ने सस्पेन्स संपवला!
सूर्यकुमार यादव का गिल... आशिया कपसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण? BCCI ने सस्पेन्स संपवला!
मुंबई : आशिया कपसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. 19 किंवा 20 ऑगस्टला मुंबईमध्ये निवड समितीची बैठक होईल आणि त्यानंतर आशिया कपसाठी भारतीय टीम जाहीर केली जाईल. आशिया कपसाठी भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव फिट होणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला होता. तसंच सूर्या आशिया कपसाठी फिट झाला नाही, तर त्याच्याऐवजी शुभमन गिलला टी-20 टीमचं नेतृत्व दिलं जाईल, अशाही चर्चा होत्या, पण आता सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दलचा सस्पेन्स संपला आहे.
सूर्यकुमार यादव आशिया कपसाठी पूर्णपणे फिट झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. हर्णियाच्या ऑपरेशननंतर सूर्यकुमार यादवची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने सुरू आहे, तसंच त्याने बॅटिंगलाही सुरूवात केली आहे. सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट व्हायच्या शेवटच्या टप्प्यावर आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवच्या फिटनेसमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो फिल्डिंग प्रॅक्टिस आणि जलद धावायच्या ट्रेनिंगला सुरूवात करेल. आशिया कपपर्यंत सूर्यकुमार यादव 100 टक्के फिट होईल. तसंच तो निवड समिती आणि प्रशिक्षकांच्याही संपर्कात आहे.
advertisement

सूर्या टी-20 चा मास्टर

सूर्यकुमार यादव हा टी-20 चा मास्टर आहे. भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा सूर्या एकट्याच्या जीवावर मॅचचं चित्र बदलू शकतो. भारतामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून आशिया कपकडे पाहिलं जात आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादवचं फक्त फिट असणंच नाही तर तो चांगल्या फॉर्ममध्ये असणंही टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सूर्यकुमार यादव का गिल... आशिया कपसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण? BCCI ने सस्पेन्स संपवला!
Next Article