Suryakumar Yadav : 'आम्हाला आधीच हिंट लागली होती, पाकिस्तान काहीतरी करणार', मुंबईत पोहोचताच सुर्याचा मोठा खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav On Pakistan : सूर्यकुमार यादव याच्यासह सर्व खेळाडूंचं विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अशातच आता मुंबईत पोहोचल्यावर सूर्यकुमार यादवने मोठा खुलासा केला आहे.
Asia Cup 2025 Final : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक फायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केलं अन् नव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाला पाकिस्तान क्रिकेटच्या अध्यक्षामुळं ट्रॉफी मिळाली नाही पण टीम इंडियाच्या खेळाडूंचं जल्लोषात स्वागत झालं. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह सर्व खेळाडूंचं विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अशातच आता मुंबईत पोहोचल्यावर सूर्यकुमार यादवने मोठा खुलासा केला आहे.
15 मिनिटं बसून प्लॅन
आम्ही दुबईमध्ये फक्त मॅच खेळायला गेलो होतो. आम्ही शेवटपर्यंतच तेच केलं. पाकिस्तानला आम्ही ग्रुप स्टेजमध्ये हरवलं. त्यावेळी आम्ही हँडशेक केला नाही. याचा नक्कीच त्यांन राग आला होता. आम्हाला माहिती होतं की, त्यांना राग आला असावा. पाकिस्तान आता सुपर फोरच्या सामन्यात सहजतेने उतरणार नाही, याची जाणीव आम्हाला होती. सुपर फोर सामन्याच्या आधी आम्ही सगळे टीम इंडियाचे खेळाडू बसलो आणि आमची चर्चा झाली. आम्ही 15 मिनिटं बसून सगळा प्लॅन डिस्कस केला. पाकिस्तान काहीतरी करणार, याची आम्हाला आधीच हिंट लागली होती, असं सूर्यकुमार यादव याने म्हटलं आहे.
advertisement
आशिया कप घ्यायला नकार दिला नाही - सूर्या
पाकिस्तानने आम्हाला दुसऱ्या मॅचमध्ये डिवचण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला ते सर्व माहिती होतं. पण आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो आणि आम्ही तेच केलं, असं सूर्यकुमार यादव याने म्हटलं आहे. आम्ही आशिया कप घ्यायला नकार दिला नाही. आम्ही व्यासपीठाच्या खाली उभे असताना अचानक काही लोक मेडल आणि ट्रॉफी घेऊन वेगळ्या बाजूला निघून गेले, असे सूर्यकुमार यादव याने सांगितलं.
advertisement
निवासस्थानी जल्लोषात स्वागत
दरम्यान, आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादव याचे त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याच इमारतीत राहणारे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्याचे शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केले. यावेळी सूर्यकुमाराचे औक्षणही करण्यात आले. त्यानंतर सूर्यकुमार याने शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटो सेशन देखील केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : 'आम्हाला आधीच हिंट लागली होती, पाकिस्तान काहीतरी करणार', मुंबईत पोहोचताच सुर्याचा मोठा खुलासा!