6,6,6,6! क्या बात है सुर्यकुमार यादव, कॅमरून Shocked, तोडला विराटचा रेकॉर्ड; Video होतोय व्हायरल

Last Updated:

शुभमन गिल (104) आणि श्रेयस अय्यर (105) यांनी तुफानी बॅटिंग करून शतकं झळकावली, तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं 37 बॉलमध्ये 72 रन करत शानदार कामगिरी केली.

News18
News18
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : वर्ल्ड कपपूर्वी तीन वन-डे मॅचेसची सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आली आहे. या सीरिजमधील दुसरी मॅच काल (24 सप्टेंबर) इंदूर येथे खेळवण्यात आली. ही मॅच भारतानं 99 रन्सच्या फरकानं जिंकली. या विजयासह टीम इंडियानं वन-डे सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेत मालिकाविजय साकारला आहे. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समननी स्फोटक शैलीत फलंदाजी केली.
शुभमन गिल (104) आणि श्रेयस अय्यर (105) यांनी तुफानी बॅटिंग करून शतकं झळकावली, तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं 37 बॉलमध्ये 72 रन करत शानदार कामगिरी केली. सूर्यानं 72 रनच्या नाबाद खेळीत सहा सिक्स आणि सहा फोर मारले. ज्याच्या जोरावर भारतानं 50 ओव्हरमध्ये 399 रन केले. यादरम्यान सूर्यकुमारनं विराट कोहलीचा एक विक्रम मोडला.
advertisement
सूर्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मॅचमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्यापूर्वी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डेमध्ये 27 बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं होतं. सूर्याने अवघ्या 24 बॉलमध्ये अर्धशतक ठोकून बॉलर्सची कोंडी केली. या शिवाय, वनडेमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकवणारा तो तिसरा खेळाडू ठरला. वन-डे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम सध्या भारतीय टीमचा मुख्य निवडकर्ता असलेल्या अजित आगरकरच्या नावावर आहे. आगरकरनं 2000 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतासाठी केवळ 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. कपिल देव, सेहवाग, राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांनी वन-डेमध्ये 22 बॉलमध्ये अर्धशतकं झळकवली होती. सूर्याचं वन-डेतील हे दुसरं अर्धशतक ठरलं. पहिल्या वन-डे मध्येही सूर्यानं 49 बॉलमध्ये 50 रन केले होते.
advertisement
कॅमेरून ग्रीनची केली धुलाई
72 धावांच्या स्फोटक खेळीदरम्यान सूर्यानं एका ओव्हरमध्ये सलग चार सिक्स मारून बॉलर कॅमेरून ग्रीनची धुलाई केली. भारताच्या इनिंगदरम्यान 44व्या ओव्हरमध्ये सूर्यानं कॅमेरून ग्रीनला रिमांडवर घेतलं. ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सूर्यानं डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं सिक्स ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर लेग साइडला स्कूप शॉट मारला. तो बॉलही प्रेक्षकांमध्ये गेला. तिसर्‍या बॉलवर त्यानं ऑफ साइडला सिक्स मारला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर सूर्याने आणखी एक सिक्स ठोकत कॅमेरून ग्रीनची बॉलिंग लेग्थ बिघडवून टाकली. सूर्याला अशी चमत्कारिक कामगिरी करताना बघताना चाहत्यांना उत्सुकता लागली होती की तो 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारणार का? पण, असं होऊ शकलं नाही.
advertisement
श्रेयस अय्यरला त्याच्या उत्कृष्ट बॅटिंगसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. भारतानं दिलेल्या 399 टारगेटसमोर ऑस्ट्रेलियन टीम 28.2 ओव्हरमध्ये 217 रन करून ऑल आउट झाली. पावसामुळे ऑस्ट्रेलियाला सुधारित टारगेट मिळालं होतं. डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हरमध्ये 317 रन करायचे होते.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
6,6,6,6! क्या बात है सुर्यकुमार यादव, कॅमरून Shocked, तोडला विराटचा रेकॉर्ड; Video होतोय व्हायरल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement