advertisement

Swapnil Kusale : 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये मेडल, खाशाबा यांच्यानंतर स्वप्निलने केलं 'स्वप्न' पूर्ण

Last Updated:

स्वप्निल कुसाळेने पटकावलेलं पदक महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिक पदक मिळालंय.

News18
News18
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तिसरं पदक जमा झालं असून नेमबाजीतच कांस्यपदक मिळालं. याआधी मनु भाकरने एकेरी आणि मिश्र अशा दोन्ही प्रकारात पदक पटकावलंय. यानंतर कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळे यानं ५० मीटर रायफल ३ पोजिशन प्रकारात कांस्यपदक पटकावलं. पहिल्या फेरीअखेर तो सहाव्या स्थानी होता. मात्र त्यानंतर त्याने कामगिरी सुधारत अंतिम तिघांमध्ये स्थान मिळवलं. पण शेवटी थोडक्यात त्याचं रौप्य पदक हुकलं. स्वप्निल कुसाळेने पटकावलेलं पदक महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ७२ वर्षांनी ऑलिम्पिक पदक मिळालंय.
१९५२ च्या हेलिसंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं होतं. महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी त्यानंतर आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यांना पदक पटकावण्यात यश मिळालं नव्हतं. तेजस्वीनी सावंत, राही सरनोबत यांनी ऑलिम्पिक स्पर्धात भाग घेतला. पण पदक पटकावता आलं नव्हतं.
भारतीय शूटर स्वप्निल कुसळे यानं नीलिंग पोजिशनमध्ये चांगली कामगिरी केली. सलग चार शॉट १० पेक्षा जास्त गुणांचे होते. सहाव्या फेरीनंतर स्वप्निल पाचव्या स्थानी पोहोचला होता. पण नंतर त्याने ४३ शॉटनंतर तिसऱ्या स्थानी झेप घेतली. प्रोन पोजिशनमध्येही स्वप्निलने सुरुवातीच्या प्रत्येक शॉटला 10.5 पेक्षा जास्त गुण मिळवले. त्याने पाचवे स्थान कायम राखले होते. तर स्टँडिंग पोजिशनमध्ये त्याने चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी झेप घेतली होती.
advertisement
स्वप्निलने मंगळवारी झालेल्या पात्रता फेरीत ५० मीटर रायफल ३ पोजिशन शूटिंगमध्ये एकूण ५९० गुण मिळवत फायनल गाठली होती. त्याने निलिंगमध्ये १९८, प्रोनमध्ये १९७ तर स्टँडिंगमध्ये १९५ गुण मिळवले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Swapnil Kusale : 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये मेडल, खाशाबा यांच्यानंतर स्वप्निलने केलं 'स्वप्न' पूर्ण
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement