दिव्यांग खेळाडूंची विशेष कामगिरी, पाहा कशी झाली जलतरण स्पर्धा? Video

Last Updated:

भारतात सुविधांचा तुटवडा असला तरी दिव्यांग तरुण विविध खेळांकडे वळत आहेत. नुकतेच डोंबिवलीत दिव्यांगांची जलतरण स्पर्धा झाली.

+
दिव्यांग

दिव्यांग खेळाडूंची विशेष कामगिरी, पाहा कशी झाली जलतरण स्पर्धा?

डोंबिवली, 9 ऑक्टोबर: खेळ प्रत्येकाला एक वेगळी उर्जा देतो आणि जगण्याची जिद्द अधिक प्रबळ करतो. यामध्ये सामान्य मुलांना तर या शब्दाबरोबर मैदानही सहज आपलेसं करता येतं. मात्र दिव्यांग खेळाडू आपल्या शारीरिक व्याधींवर मात करत खेळाकडे वळतात. तेव्हा मैदानच त्यांना खऱ्या अर्थाने जगण्याची हिंमत देते. या दिव्यांगासाठी पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात जलतरण स्पर्धा भरवण्यात आल्या. या 15 व्या पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 110 दिव्यांग खेळाडूनी सहभाग घेतला. या स्पर्धे दरम्यान दिव्यांग खेळाडूंमधील विषेश कौशल्य दिसून आले.
दिव्यांग खेळाडूंना मार्गदर्शन
दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचं काम पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र ही संस्था करते. खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये दिव्यांग खेळाडूंची निवड व्हावी यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जातात. आजवर अनेक खेळाडूंसाठी ही संस्था यशाचे शिखर गाठणारी पायरी ठरली आहे.
advertisement
सरावासाठी सुविधा मिळत नाहीत
पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे यांनी स्पर्धांसाठी मैदाने उपलब्ध होत असली तरी सरावासाठी सुविधा मिळत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. यामुळेच खेळाडूंकडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन व्हावे यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
advertisement
50 मीटर लांबीचे पूल नसल्याने अडचण
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सिद्धी दळवी या खेळाडूने 5 प्रकारच्या जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. सिद्धी मागील 8 वर्षांपासून विविध प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात 50 मीटर लांबीचे पूल उपलब्ध नाहीत. मात्र स्पर्धेसाठी 50 मीटर लांबीचे पूल आवश्यक आहेत. यामुळे खेळाडू मागे पडत असल्याने सरावासाठी 50 मीटर लांबीचे पूल उपलब्ध व्हावेत, अशी मागणी सिद्धी करते.
advertisement
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द कायम ठेवून या मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दिव्यांग स्पर्धक आले होते.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दिव्यांग खेळाडूंची विशेष कामगिरी, पाहा कशी झाली जलतरण स्पर्धा? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement