T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत; पाऊस व्हिलन ठरला तर..?
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
T20 World Cup 2024: टीम इंडियाने पहिल्याच मॅचमध्ये आयर्लंडचा पराभव करून आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे, तर पाकिस्तानला पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करून आणि सलग दुसरा विजय नोंदवून सुपर एटसाठी आपला दावा मजबूत करण्यास उत्सुक आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट टीम्स रविवारी (9 जून) न्यूयॉर्कमध्ये पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2024मधली ही हाय व्होल्टेज लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल. या मॅचला हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने पहिल्याच मॅचमध्ये आयर्लंडचा पराभव करून आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे, तर पाकिस्तानला पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करून आणि सलग दुसरा विजय नोंदवून सुपर एटसाठी आपला दावा मजबूत करण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानदेखील विजयाच्या हेतूने मैदानात उतरेल आणि सुपर एटच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न करील. अॅक्युवेदर डॉट कॉम या हवामानविषयक वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान मॅचच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालची टीम इंडिया आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालच्या पाकिस्तान टीमची लढत न्यूयॉर्कमधल्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर रंगणार आहे. स्थानिक वेळेनुसार ही मॅच सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्या वेळी भारतात रात्रीचे 8 वाजलेले असतील. न्यूयॉर्कमध्ये सकाळी 11 वाजता पाऊस पडण्याची शक्यता 51 टक्के आहे. म्हणजेच मॅच सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्याशिवाय मॅचच्या दिवशी पहाटेदेखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
advertisement
पावसामुळे मॅच रद्द झाल्यास काय होईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली मॅच पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही टीम्सना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. लीग स्टेजमधल्या मॅचेससाठी राखीव दिवसाची तरतूद नाही. आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे दोन्ही टीम्सना मॅच रद्द होणं रुचणार नाही. ही मॅच दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकून टीम इंडिया सुपर एटसाठी आपला दावा मजबूत करील. पाकिस्तान पराभूत झाल्यास ते सुपर एटच्या शर्यतीतून जवळपास बाहेर जातील.
advertisement
पाकिस्तानसाठी 'करो या मरो'
भारताविरुद्धची मॅच बाबर आझमच्या टीमसाठी 'करा किंवा मरो' प्रकारची आहे. यजमान अमेरिकेकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानसाठी पुढची वाटचाल अवघड झाली आहे. सलग दोन विजय नोंदवल्यानंतर या गटात अमेरिका चार गुणांसह पहिल्या, तर दोन गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचं अद्याप खातंही उघडलेलं नाही. टीम इंडियाला पराभूत केल्यानंतरच पाकिस्तानकडे सुपर एटमध्ये पोहोचण्याची संधी असेल. ही मॅच पावसामुळे रद्द झाली आणि पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंडला पराभूत केलं, तरी त्यांना फक्त पाच गुण मिळवता येतील. टीम इंडिया कॅनडा आणि अमेरिकेला हरवून सुपर एटमध्ये पोहोचू शकेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 08, 2024 11:25 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत; पाऊस व्हिलन ठरला तर..?