Team India वर्ल्डकप जिंकले पण..., क्रिकेटच्या 148 वर्षातील हैराण करणारी घटना; 10 लाख 48 हजार 576 तून एकदा असं होतं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Team India: भारतीय क्रिकेट संघाने सलग 20 वेळा टॉस गमावण्याचा अविश्वसनीय विक्रम केला असून ही घटना 10 लाखात फक्त एकदाच घडू शकणारी आहे. के.एल. राहुलसह संपूर्ण टीम या ‘टॉस शापामुळे’ हैराण असली तरी संघ मात्र सामन्यांत दमदार विजय मिळवत आहे.
रायपूर: मला एकदा फसवले, तर चूक तुमची. मला दोनदा फसवले, तर चूक माझी. मला वीस वेळा फसवले... म्हणजे तुम्ही 'मेन इन ब्लू' अर्थात भारतीय क्रिकेट संघ असाल. हे वाचून तुम्हाला ही थोडे विचित्र वाटेल पण क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियासोबत अशी घटना घडली आहे ज्याची शक्यता फक्त 10 लाख 48 हजार 576 मध्ये फक्त एकदा आहे. दुसऱ्या भाषेत 0.000095% इतकी होय.
advertisement
ही आकडेवारी वाचून एखादी पटकथेतील गंमत वाटेल. पण प्रत्यक्षात असे घडले आहे. भारताने सलग 20 वनडे मॅचमध्ये टस गमावला आहे. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलात, 20 वेळा. इतकी अशक्य वाटणारी ही घटना गणिताच्या भाषेत सांगायची तर अधिक क्लिष्ट कारण सलग इतक्या वेळा टॉस गमावण्याची शक्यता तब्बल 10 लाख 48 हजार 576 पैकी फक्त एकदा आहे. टक्केवारीत बोलायचे झाले तर 0.000095% इतकी. धक्कादायक म्हणजे वीज पडण्याची शक्यता याहून अधिक असते.
advertisement
नाणेफेकीच्या बाबतीत भारतीय संघाचे नशीब पूर्णपणे रुसले आहे. ठिकाण, प्रतिस्पर्धी किंवा कर्णधार कोणीही असो. गेल्या दोन वर्षांत तीन वेगवेगळ्या कर्णधारांना संधी देऊनही, नाणेफेकीचा कौल कायम संघाच्या विरोधात आहे. 'मेन इन ब्लू' ने शेवटचा टॉस 15 नोव्हेंबर 2023 रोजी धरमशाला येथे वनडे विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये टॉस गमावला आणि तेव्हापासून टॉस गमावण्याचा सिलसीला सुरूच आहे.
advertisement
सध्या क्रिकेट इतिहासातील सर्वात चर्चेत ठरलेल्या या टॉसबद्दल भारताचा कर्णधार केएल राहुल देखील दडपण असल्याचे सांगितले. आज दुसऱ्या वनडेत टॉससाठी आल्यावर तो म्हणाला, खरं सांगायचं तरहे माझ्यासाठी सर्वात मोठे दडपण आहे. कारण आम्ही बऱ्याच काळापासून नाणेफेक जिंकलेली नाही. मी सराव करत आहे, पण स्पष्टपणे त्याचा उपयोग होत नाहीये, अशी कबुली त्याने रवी शास्त्रींना दिली.
advertisement
राहुलने सलग पाच टॉस गमावले
भारताने सलग 20 वेळा टॉस गमावले असेल तरी संघ मॅच जिंकत आहे. भारताने या काळात 63 टक्के मॅच जिंकल्या आहेत. भारताचे हे टॉस गमावणे आता चाहत्यांसाठी लॉटरी जिंकण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे.
advertisement
दरम्यान आज रायपूरमध्ये होत असलेल्या दुसऱ्या वनडेत भारताने कोणताही बदल न करता तोच संघ कायम ठेवला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने संघात फेरबदल केले. त्यांनी टेम्बा बावुमा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांना संघात स्थान दिले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India वर्ल्डकप जिंकले पण..., क्रिकेटच्या 148 वर्षातील हैराण करणारी घटना; 10 लाख 48 हजार 576 तून एकदा असं होतं


