Team India : नव्या वर्षात विराट-रोहित मैदानात कधी उतरणार? इथे पाहा टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल

Last Updated:

टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये निराशाजनक गेलं असलं, तरी वनडे आणि टी-20 मध्ये भारतीय टीमची कामगिरी उत्कृष्ट झाली.

नव्या वर्षात विराट-रोहित मैदानात कधी उतरणार? इथे पाहा टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल
नव्या वर्षात विराट-रोहित मैदानात कधी उतरणार? इथे पाहा टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल
मुंबई : टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष टेस्ट क्रिकेटमध्ये निराशाजनक गेलं असलं, तरी वनडे आणि टी-20 मध्ये भारतीय टीमची कामगिरी उत्कृष्ट झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने आशिया कपमध्ये विजय मिळवला. वर्षाच्या शेवटच्या टी20 सीरिजमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने पराभव केला. आता भारतीय क्रिकेटचे चाहते पुढच्या सीरिजची वाट पाहत आहेत.
भारतीय क्रिकेट टीम आता 2026 मध्ये मैदानात उतरणार आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 3 वनडे मॅचच्या सीरिजने होईल. त्यानंतर दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज असेल. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज 31 जानेवारीला संपणार आहे.
advertisement
आधी वनडे सीरिज
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरूवातीला वनडे सीरिज खेळवली जाईल. तीन सामन्यांची ही सीरिज 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सीरिजचा शेवटचा सामना 18 जानेवारीला खेळवला जाईल. वनडे सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये टी-20 सीरिज होईल. टी-20 सीरिजला 21 जानेवारीला सुरूवात होईल.

विराट-रोहितचं कमबॅक

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता ते फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट रोहित पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसतील. न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज झाल्यानंतर मात्र विराट-रोहित मोठ्या ब्रेकवर जातील, कारण पुढचे दोन महिने भारत-न्यूझीलंड टी-20 सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कप आहे, त्यामुळे थेट मार्च महिन्याच्या शेवटी आयपीएल 2026 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसतील.
advertisement

भारत-न्यूझीलंड वनडे सीरिज

11 जानेवारी - पहिला वनडे : बडोदा (दुपारी 1:30)
14 जानेवारी - दुसरी वनडे : राजकोट (दुपारी 1:30)
18 जानेवारी - तिसरा वनडे : इंदूर (दुपारी 1:30)

भारत-न्यूझीलंड टी-20 सीरिज

21 जानेवारी - पहिला T20: नागपूर (संध्याकाळी 7)
23 जानेवारी - दुसरी T20: रायपूर (संध्याकाळी 7)
25 जानेवारी - तिसरा T20: गुवाहाटी (संध्याकाळी 7)
advertisement
28 जानेवारी - चौथी T20 : विशाखापट्टणम (संध्याकाळी 7)
31 जानेवारी - पाचवी T20: तिरुवनंतपुरम (संध्याकाळी 7)
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : नव्या वर्षात विराट-रोहित मैदानात कधी उतरणार? इथे पाहा टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement