Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची जबरदस्त दहशत, सामन्याआधीच ओमानचा संघ घाबरला

Last Updated:

14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून ओमान प्रचंड घाबरलेला आहे. कारण इतक्या कमी वयात ज्या प्रमाणे वैभव सूर्यवंशी खेळतो आहे, ते पाहून अख्खा ओमान संघ दहशतीत आहे.

vaibhav Suryavanshi
vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi News : कतर दोहामध्ये सध्या आशिया कप राइझिंग स्टार 2025 ची स्पर्धा सूरू आहे. या स्पर्धेत आज भारत अ आणि ओमानमध्ये करो या मरोचा सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून ओमान प्रचंड घाबरलेला आहे. कारण इतक्या कमी वयात ज्या प्रमाणे वैभव सूर्यवंशी खेळतो आहे, ते पाहून अख्खा ओमान संघ दहशतीत आहे.
advertisement
खरं तर आशिया कप राइझिंग स्टार स्पर्धेत वैभव सूर्यवंशी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने युएई विरूद्ध 144 रनची वादळी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 15 सिक्स आणि 11 फोर मारले होते. यानंतर पाकिस्तान शाहिन्स विरूद्धच्या सामन्यात वैभवने 45 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर आज वैभव सूर्यवंशी ओमान विरूद्ध खेळणार आहे. पण या सामन्याआधीच ओमानचे खेळाडू दहशतीत आहे.
advertisement
ओमानचे हे खेळाडू दहशतीत असले तरी वैभव विरूद्ध खेळण्यासही उत्सुक आहेत. ओमानचे खेळाडू समय श्रीवास्तव आणि आर्यन बिष्ट वैभव सूर्यवंशीविरुद्ध खेळण्यास खूप उत्सुक आहेत. "आम्ही वैभव सूर्यवंशीला फक्त टीव्हीवर पाहिले आहे आणि आता आम्ही त्याच्याविरुद्ध खेळणार आहोत. १४ वर्षांचा असूनही, तू आतापर्यंत चेंडू इतक्या दूर मारू शकतोस, ही एक विशेष प्रतिभा आहे. प्रत्येकजण ते करू शकत नाही आणि मीही त्या वयात करू शकत नव्हतो, असे टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आर्यन बिष्ट म्हणाला आहे. तू 14 वर्षांचा आहेस, तू ते षटकार कसे मारतोस? तो अविश्वसनीय प्रतिभावान आहे. म्हणूनच मी त्याच्याविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे,असेही बिष्ट म्हणाला आहे.
advertisement
समय श्रीवास्तव पुढे म्हणाला, "त्याला भेटणे ही एक खास संधी असेल. मला क्रिकेटबद्दलची त्याची मानसिकता समजून घ्यायची आहे. तो फक्त 14 वर्षांचा आहे आणि आधीच भारतासाठी चांगली कामगिरी करत आहे. मला त्याला भेटायला आवडेल. तो ज्या पद्धतीने मोठे षटकार मारतो ते काहीतरी खास आहे. मला त्याच्याशी बोलायला आवडेल.
advertisement
किती वाजता आहे सामना
या स्पर्धेत भारत अ संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एक जिंकला आहे आणि एक पराभव पत्करला आहे. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ आता 18 नोव्हेंबर रोजी ओमानशी सामना करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची जबरदस्त दहशत, सामन्याआधीच ओमानचा संघ घाबरला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement