परंडा नगरपरिषदेत राडा, दोन गटात तुफान दगडफेक; तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचे कार्यकर्ते भिडले
- Published by:Prachi Amale
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
परंडा नगरपरिषदेत झालेल्या दडडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे,
धाराशिव : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याचे पाहायला मिळत असताना दुसरीकडे धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे, परंडा नगरपरिषदेत राजकीय वादातून दोन गटात दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे. परंडा नगरपरिषदेत तानाजी सावंत आणि राहुल मोटे यांचा गट आमने-सामने आले आहे.
परंडा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचे कार्यकर्ते आपसात भिडले आहे. निवडणूक अर्जावर आक्षेप घेतल्याने गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत आणि राहुल मोटे गटाचे कार्यकर्ते भिडले असून परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तानाजी सावंत गटाचे उमेदवार झाकीर सौदागर आणि माजी आमदार राहुल मोटे गटाचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात वादावादी झाली आहे.
advertisement
दोन पोलीस कर्मचारी जखमी
शिवसेनेच्या उमेदवारावर आक्षेप घेतला होता. हा आक्षेप फेटाळल्यानंतर वादावादी झाली आणि या वादावादीचे रूपांतर दगडफेकीत घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परंडा नगरपरिषदेत राडा, दोन गटात तुफान दगडफेक; तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचे कार्यकर्ते भिडले


