मामाने भाचीला ट्रेनमधून ढकललं, अल्पवयीन भाचीचा मृत्यू, मुंबईतली घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
आरोपी मामा अर्जुन सोनी हा मुली सोबत चर्चगेट–विरार लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात होता. त्याने प्रवासादरम्यान अल्पवयीन भाचीला ढकलले.
विजय देसाई, प्रतिनिधी, मुंबई वसई : वसई–नायगाव भाईंदर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन भाचीला सख्या मामानेच चालत्या लोकलमधून ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
15 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेल्या कोमलचा मृतदेह 17 नोव्हेंबर रोजी रेल्वे पटरीवर सापडला. रेल्वे पोलिसांच्या तपासात समोर आले की आरोपी मामा अर्जुन सोनी हा मुली सोबत चर्चगेट–विरार लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात होता. नायगावजवळ दरवाज्यावर उभ्या असताना त्याने भाचीला मागून ढकलले आणि ती खाली पडून जागीच मृत्यू पावली.
प्रत्यक्षदर्शी प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना पाहून इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या आरोपीला वलिव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 5:34 PM IST


