Shubman Gill : महाराष्ट्राचा पोरगा गिलची जागा घ्यायला तयार! फायनलमध्ये शतक, 5 सामन्यात ठोकल्या 335 रन

Last Updated:

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग गडगडली आहे. कर्णधार शुभमन गिल याच्यासह टीम इंडियाचे स्टार सपशेल अपयशी ठरले आहेत.

महाराष्ट्राचा पोरगा गिलची जागा घ्यायला तयार! फायनलमध्ये शतक, 5 सामन्यात ठोकल्या 335 रन
महाराष्ट्राचा पोरगा गिलची जागा घ्यायला तयार! फायनलमध्ये शतक, 5 सामन्यात ठोकल्या 335 रन
बंगळुरू : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये वनडे सीरिजची तिसरी आणि निर्णायक वनडे मॅच सुरू असतानाच विजय हजारे ट्रॉफीची फायनल बंगळुरूमध्ये सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग गडगडली आहे. रोहित शर्मा 11, कर्णधार शुभमन गिल 23, श्रेयस अय्यर 3 आणि केएल राहुल 1 रनवर आऊट झाले. टीम इंडियाचे बॅटर संघर्ष करत असतानाच दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारताच्या नवोदित खेळाडूने धमाका केला आहे.
विजय हजारे ट्रॉफीची फायनल विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यात सुरू आहे. या सामन्यात सौराष्ट्रने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर विदर्भाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 317 रन केले. विदर्भाकडून ओपनर अथर्व तायडेने 118 बॉलमध्ये 128 रनची खेळी केली, तर यश राठोडने 54 आणि अमन मोखाडेने 33 रन केले. अथर्व तायडेच्या शतकी खेळीमध्ये 15 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
advertisement

अथर्व ठोठावतोय टीम इंडियाचे दरवाजे

मागच्या काही काळामध्ये अथर्व तायडे बॅटने धमाका केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये दिल्लीविरुद्ध त्याने 62 रन केले होते, तर ग्रुप स्टेजला अथर्वने आसामविरुद्ध 80 आणि बडोद्याविरुद्ध 65 रन केले होते. 2023-24 च्या रणजी ट्रॉफीमध्ये अथर्व तायडेने 10 इनिंगमध्ये 51.44 च्या सरासरीने 463 रन केले होते.
advertisement
विदर्भाकडून ओपनिंगला खेळत असलेला अथर्व तायडे मागच्या काही काळापासून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावत आहे, पण त्याला संधी मिळत नाहीये. मागच्या काही काळामध्ये शुभमन गिलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. गिलच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याची टी-20 वर्ल्ड कप टीममध्येही निवड झाली नाही, त्यामुळे भविष्यात अथर्व तायडेला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : महाराष्ट्राचा पोरगा गिलची जागा घ्यायला तयार! फायनलमध्ये शतक, 5 सामन्यात ठोकल्या 335 रन
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement