VIDEO : जा एकदाचा बाहेर..., विराट खूपच वैतागला, न्यूझीलंडच्या खेळाडूला मैदानाबाहेर ढकललं!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 337 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर 338 धावांचे लक्ष्य आहे.
India vs New zealand 3rd Odi : तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करून 337 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर 338 धावांचे लक्ष्य आहे. न्यूझीलंडकडून या धावा उभारण्यात डेरी मिचेल आणि ग्लेन फिलिप्सने मोलाची भूमिका बजावली होती. या दरम्यान सामन्यात एक अशी घटना घडली जेव्हा विराट कोहली खुपच वैतागला आणि त्याने न्यूझीलंडच्या खेळाडूला ढकललं होतं. त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेऊयात.
खरं तर सामन्याच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर अर्शदिप सिंहने हेन्री निकोलीसला शुन्यावर बाद केले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेला बाद करून दोन्ही समालीमीवर माघारी धाडले.अशाप्रकारे टीम इंडियाची सूरूवात चांगली झाली होती.रविंद्र जडेजाने त्यानंतर विल यंगला 30 धावांवर कॅच आऊट केले होते. त्यानंतर डेरी मिचेल आणि ग्लेन फिलिप्सची ही जोडी मैदानात आली होती.
advertisement
Kohli pushed him and said don't come back. 🤣❤ pic.twitter.com/VNJbcZ5DIX
— ` (@wokenupkohli) January 18, 2026
या दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाला प्रचंड रडवलं होत. कारण टीम इंडियाविरूद्ध नेहमी धावा करणारा डेरी मिचेल 137 धावांची शतकीय खेळी करून बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 15 चौकार लगावले. ज्यावेळेस मिचेल बाद झाला तेव्हा रोहित विराट पासून सगळ्यांनीच त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले.
advertisement
शेवटी ज्यावेळेस डेरी मिचेल बाद झाला त्यावेळेस बाऊंन्ड्री लाईनवर त्याची भेट विराट कोहलीशी झाली.या भेटी दरम्यान विराट कोहलीने त्याच्या भेटीचे कौतुक केले. तसेच त्यानंतर विराटने त्याच्या पाठीला पकडत त्याने त्याला बाहेर ढकललं. विराटने त्याला मजेशीरपणे हे ढकललं. जा एकदाचा बाहेर असे त्याचं म्हणण होतं कारण ज्या प्रमाणे त्याने भारतीय गोलंदाजांची त्याने धुलाई केली होती, ते पाहता तो कधी मैदानाबाहेर जातो आहे,याकडे सर्वांच लक्ष होते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन - डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 8:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : जा एकदाचा बाहेर..., विराट खूपच वैतागला, न्यूझीलंडच्या खेळाडूला मैदानाबाहेर ढकललं!









