Rohit Sharma : विराटने उचलला नाही कॉल, रोहितनेही बोलणं सोडलं, टीम इंडियाचा चॉकलेट बॉय कसा झाला व्हिलन?

Last Updated:

Rohit Sharma Captaincy ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. वनडे सीरिजमध्ये रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून शुभमन गिलला वनडे टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे.

विराटने उचलला नाही कॉल, रोहितनेही बोलणं सोडलं, टीम इंडियाचा चॉकलेट बॉय कसा झाला व्हिलन?
विराटने उचलला नाही कॉल, रोहितनेही बोलणं सोडलं, टीम इंडियाचा चॉकलेट बॉय कसा झाला व्हिलन?
मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. वनडे सीरिजमध्ये रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून शुभमन गिलला वनडे टीमचं कर्णधार करण्यात आलं आहे. निवड समितीच्या या निर्णयावरून रोहित शर्मा संतापल्याचं वृत्त समोर आलं आहे. एवढच नाही तर आगरकरने रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळायला सांगितलं होतं, पण यावरही रोहित शर्माने आगरकरला रिप्लाय दिला नसल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी विराट कोहलीनेही अजित आगरकरचा फोन उचलल्याचं वृत्त समोर आलं होतं, त्यामुळे एकेकाळी टीम इंडियाकडून खेळताना चॉकलेट बॉय म्हणून ओळख मिळालेला अजित आगरकर अचानक विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी व्हिलन झाला आहे.
शनिवारी निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीमची निवड करताना अनेकांना धक्का दिला. याआधी रोहित शर्मा टीम इंडियाकडून खेळला तेव्हा तो कर्णधार होता, तसंच त्याच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही जिंकली होती, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची टीममध्ये निवड तर झाली, पण त्याला कर्णधार ठेवण्यात आलं नाही.
रोहितच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि त्याआधी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजय मिळवला होता. पण आता वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून टाकल्यामुळे रोहित टीम इंडियाचं व्यवस्थापन आणि अजित आगरकरवर नाराज झाल्याचं वृत्त आहे. निवड समितीने रोहितला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून टाकल्यामुळे त्याच्या 2027 चा वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
advertisement

काय म्हणाला आगरकर?

रोहितला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यावर निवड समिती प्रमुख अजित आगरकरने प्रतिक्रिया दिली आहे. 'तीन फॉरमॅटसाठी तीन कॅप्टन करणं अशक्य आहे. प्लानिंगच्या हिशोबाने आम्ही तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधार ठेवू शकत नाही', असं आगरकर म्हणाला आहे.

भारताची वनडे टीम

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल
advertisement

भारताची टी-20 टीम

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : विराटने उचलला नाही कॉल, रोहितनेही बोलणं सोडलं, टीम इंडियाचा चॉकलेट बॉय कसा झाला व्हिलन?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement