गंभीरने ज्याच्यावर विश्वास दाखवला, त्याने निवड होताच मैदान गाजवलं, कोण आहे टीम इंडियाचा छुपारुस्तम?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेत उत्कृष्ट खेळी करणाऱ्या एका खेळाडूला या दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे ही संधी मिळताच क्षणी त्याने टेस्ट सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
India vs West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक खेळाडूंना संधी मिळालेली आहे, तर काहींना डच्चू मिळाला आहे. इंग्लंड विरूद्ध टेस्ट मालिकेत उत्कृष्ट खेळी करणाऱ्या एका खेळाडूला या दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे ही संधी मिळताच क्षणी त्याने टेस्ट सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.त्यामुळे या कामगिरीच्या बळावर खेळाडूने गंभीरने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आहे. वॉशिंग्टन सुंदर यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या 15 सदस्यीय संघात निवड झाली आहे. ही निवड होताच त्याने मैदान गाजवलं.सध्या टीम इंडिया आशिया कप खेळते आहे. पण टीम इंडियाचा हा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर सध्या काऊंटी क्रिकेट खेळत आहे. या स्पर्धेत खेळताना त्याने मैदान गाजवलं आहे.
advertisement
भारताचा वॉशिंग्टन सुंदर हा काऊंटी चॅम्पियन्सशिपमध्ये हॅम्पशायर संघाचा भाग आहे. सरे विरूद्ध खेळताना सूरूवातीला गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने तीन महत्वपुर्ण विकेट घेतल्या होत्या. तर फलंदाजी करताना त्याने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. त्याची ही कामगिरी पाहता गौतम गंभीरने केलेली त्याची निवड योग्य ठरवली आहे.
इंग्लंडविरूद्ध टेस्टमध्येही जबरदस्त कामगिरी
वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंड विरुद्ध टेस्ट सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती.सुंदरने पहिल्या सामन्यात २७ धावा तर दुसऱ्यात ४२ धावा केल्या होत्या. तिसऱ्या टेस्टमध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या होत्या. फलंदाजीत त्याला कमाल करता आली नाही. त्यानंतर चौथ्या टेस्टमध्ये सुंदरने नाबाद 101 धावा केल्या,हे त्याचं पहिलं टेस्ट शतक होते. पाचव्या टेस्टमध्ये सुंदरने 53 धावांची खेळी केली होती.त्यामुळे इंग्लंड विरूद्ध उत्कृष्ट कामगिरीचे त्याला फळ मिळाले आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ:
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत कुमार पटेल, जसप्रीत कुमार रेड्डी, एन. (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 9:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
गंभीरने ज्याच्यावर विश्वास दाखवला, त्याने निवड होताच मैदान गाजवलं, कोण आहे टीम इंडियाचा छुपारुस्तम?