IND VS SA Final : '7 घंटे है तु्म्हारे पास...', शाहरुखच्या 'चक दे इंडिया' स्टाईलमध्ये बोलला, वर्ल्ड कप विजयानंतर मुझुमदारचा खुलासा, VIDEO

Last Updated:

भारताच्या या विजयात मुख्य कोच अमोल मुझुमदार पडद्यामागचे हिरो ठरले. कारण भारताच्या फायनल सामन्यात मुझुमदार यांनी जे स्पीच दिलं, या स्पीचमुळे महिला संघामध्ये एक ऊर्जा संचारली आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला

amol muzumdar
amol muzumdar
Amol Mazumdar Talking About that Speech : भारताच्या महिला संघाने मागच्याच रविवारी वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला होता.भारताच्या या विजयानंतर त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. भारताच्या या विजयात मुख्य कोच अमोल मुझुमदार पडद्यामागचे हिरो ठरले. कारण भारताच्या फायनल सामन्यात मुझुमदार यांनी जे स्पीच दिलं, या स्पीचमुळे महिला संघामध्ये एक ऊर्जा संचारली आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला.विशेष म्हणजे अमोल मुझुमदारच्या या स्पीची शाहरुखच्या 'चक दे इंडिया' स्टाईलमध्ये '70 घंटे हे तुम्हारे पास..' या डायलॉगशी तुलना केली आहे.यावर आता वर्ल्ड कप विजयानंतक अमोर मुझुमदार बोलला आहे. बीसीसीआयने याबाबतचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
advertisement
वुमेन्स वर्ल्ड कप विजयानंतर मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी बीसीसीआयला मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत त्यांनी खेळाडूंना दिलेल्या फायनल स्पीचवर भाष्य केले आहे. या भाषणाची तुलना दिग्गज शाहरुख खानच्या महिला हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला हॉकी संघाला दिलेल्या "सत्तार मिनिट" भाषणाशी केली जात आहे.
advertisement
पुढील सात तास, तुमच्या मनातील सगळा गोंधळ दूर ठेवा. सगळ्या जगाशी संपर्क तोडून स्वत:भोवती एक वर्तुळ (Bubble) तयार करा. तुम्हाला या वर्तुळामध्ये प्रवेश करायचा आहे आणि सगळं संपवूनच बाहेर यायचं आहे. आज आपण स्वत:ची कहाणी लिहणार आहोत. इथून पुढे दुसऱ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकायच्या नाहीत. आज रात्री तुम्ही सगळेजण स्वत:ची कहाणी तुमच्याच हातांनी लिहणार आहात. पुढील तास तास तुम्हाला त्याच वर्तुळात राहायचं आहे. चला इतिहास घडवुया,असे स्पीच मुझुमदार यांनी दिले होते.
advertisement
या स्पीचवर बोलताना मुझुमदार म्हणाला, उपांत्य फेरीपर्यंत त्यांना हडल टॉकमध्ये संघाला काय म्हणायचे आहे हे त्यांना अगदी ठाऊक होते, परंतु अंतिम फेरीच्या वेळी, हे भाषण त्यांच्याकडे स्वाभाविकपणे आले कारण त्यांना खरोखर बोलायचे होते."मी नाट्यमय गोष्टींबद्दल बोलत नाही. म्हणून मी त्यापासून खूप दूर आहे. जे बाहेर येते ते खूप प्रामाणिक असते आणि मी माझ्या मनापासून बोलतो. मला माहित नाही की (शाहरुखच्या चक दे ​​इंडिया भाषणाशी) समांतरता कुठून आली आहे. तथापि, मी माझा फोन वापरतो हे मी पाहिले आहे. म्हणून मला त्या गोष्टी दिसतात, तुम्हाला माहिती आहे, असे मुझुमदार म्हणाले.
advertisement
"पण अंतिम सामन्यात, सुमारे सात तास चाललेल्या सामन्यात, ते अगदी अचानक घडले. मला माहित नव्हते की मी काय बोलणार आहे, आणि त्या वेळी मी फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, मी तिथे तुम्हाला कसे वाटते याबद्दल बोलणार आहे. आणि गोंधळात गेलो आणि ती गोष्ट समोर आली,असे मुझुमदार म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS SA Final : '7 घंटे है तु्म्हारे पास...', शाहरुखच्या 'चक दे इंडिया' स्टाईलमध्ये बोलला, वर्ल्ड कप विजयानंतर मुझुमदारचा खुलासा, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement