Yashasvi Jaiswal : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, यशस्वी जयस्वालला पुण्यात विषबाधा, रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा!

Last Updated:

टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जयस्वाल याच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना मुंबईच्या राजस्थानविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यादरम्यान घडली.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, यशस्वी जयस्वालला पुण्यात विषबाधा, रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा!
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, यशस्वी जयस्वालला पुण्यात विषबाधा, रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा!
मुंबई : टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जयस्वाल याच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना मुंबईच्या राजस्थानविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यादरम्यान घडली आहे. सुरुवातीला जयस्वालला साधा पोटाचा त्रास असल्याचे मानले जात होते, पण पुढील तपासणीनंतर असे दिसून आले की त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस (पोट आणि आतड्यांची जळजळ) आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा आणि औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे.

यशस्वी जयस्वालचे वजन कमी झालं

यशस्वी जयस्वालला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि तो मुंबईत परतला आहे. गेल्या दोन दिवसांत त्याचं दोन किलोपेक्षा जास्त वजन कमी झाले आहे. डॉक्टरांनी त्याला पुढील सात ते दहा दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. एका सूत्राने सांगितले की, "अन्नातून विषबाधा झाल्यामुळे जयस्वालच्या पोटात दुखायला लागलं. त्याने पुण्यातील एका हॉटेलमध्ये काहीतरी खाल्ले, ज्यामुळे ही समस्या निर्माण झाली. त्याला वेदना होत होत्या, पण वेळेवर औषधोपचार केल्याने त्याची प्रकृती बरीच बरी आहे. गेल्या दोन दिवसांत त्याचे वजन दोन किलोपेक्षा जास्तने वजन कमी झाले आहे आणि डॉक्टरांनी त्याला किमान 7-10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे."
advertisement

बरे व्हायला वेळ लागणार

यशस्वी जयस्वालला पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान एक आठवडा लागू शकतो. त्यामुळे, तो आगामी विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. मुंबई 24 डिसेंबर रोजी सिक्कीमविरुद्धच्या सामन्यापासून विजय हजारे ट्रॉफीच्या त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल. विजय हजारे ट्रॉफीमध्ये माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत जयस्वाल डावाची सुरुवात करेल अशी अपेक्षा होती.
advertisement
सूत्रांनी पुढे सांगितले की, "विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे. यानंतर, न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका देखील आहे आणि तो त्या मालिकेसाठी टीम इंडियात असण्याची शक्यता आहे." बीसीसीआयची वैद्यकीय टीम देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, कारण पुढील महिन्यात 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
advertisement

जयस्वाल रुग्णालयात

यशस्वी जयस्वालला पोटात तीव्र वेदना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना पुण्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यादरम्यान घडली. सुरुवातीच्या तपासणीत असे वाटले की ही पोटाची साधी समस्या आहे, पण अल्ट्रासाऊंड आणि इतर चाचण्यांमध्ये असे दिसून आले की त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस (पोट आणि आतड्यांची जळजळ) आहे. यानंतर त्याला औषध देण्यात आले आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला.
advertisement
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर यशस्वी जयस्वाल मुंबईत परतला आहे. आजारामुळे त्याचे वजन दोन किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे. डॉक्टरांनी त्याला पुढील सात ते दहा दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. एका सूत्रानुसार, "हा अन्न विषबाधेचा प्रकार आहे. त्याने पुण्यातील एका हॉटेलमध्ये काहीतरी खाल्ले ज्यामुळे ही समस्या निर्माण झाली. त्याला वेदना होत होत्या, पण वेळेवर उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती आता बरीच बरी आहे. गेल्या दोन दिवसांत त्याचे वजन दोन किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे आणि डॉक्टरांनी त्याला किमान 7-10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे."
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yashasvi Jaiswal : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, यशस्वी जयस्वालला पुण्यात विषबाधा, रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा!
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement