SL vs ZIM : फक्त दोघांचाच दोन आकडी स्कोअर, झिम्बाब्वेचा T20 मधला सगळ्यात मोठा विजय, श्रीलंकेची लाज गेली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
झिम्बाब्वेने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मोठा उलटफेर केला आहे.
मुंबई : झिम्बाब्वेने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मोठा उलटफेर केला आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, झिम्बाब्वेच्या बॉलरनी श्रीलंकेच्या बॅटरना रोखले आणि त्यांना 95 रनवर ऑलआऊट केले, ज्यामुळे झिम्बाब्वेला स्पर्धेतील पहिला विजय मिळाला. या प्रभावी विजयामुळे झिम्बाब्वेचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा वरचढ झाला आहे. तसंच या विजयामुळे झिम्बाब्वे तीन टीमच्या तिरंगी मालिकेत पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. झिम्बाब्वे आणि पाकिस्तानचे प्रत्येकी दोन गुण आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये झिम्बाब्वे पाकिस्तानपेक्षा पुढे आहे.
प्रथम बॅटिंग करणाऱ्या झिम्बाब्वेने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 बाद 162 रन केल्या. सलामीवीर ब्रायन बेनेटने सर्वाधिक 49 रन केल्या, तर कर्णधार सिकंदर रझा 47 रनवर आऊट झाला. श्रीलंकेकडून वानिन्दु हसरंगाने तीन बळी घेतले, तर एहसान मलिंगाने दोन बळी घेतले. झिम्बाब्वेने दिलेल्या 163 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेचा संघ 20 ओव्हरमध्ये 95 रनवरच गारद झाला आणि सामना 67 रननी गमावला.
advertisement
दोघांचाच दोन आकडी स्कोअर
कर्णधार दासुन शनाका आणि भानुका राजपक्षे यांनी दुहेरी आकडा गाठला. शनाकाने 25 बॉलमध्ये दोन फोर आणि दोन सिक्ससह 34 रन केल्या, तर भानुकाने 18 बॉलमध्ये 11 रनचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने 4 ओव्हरमध्ये 9 रनमध्ये 3 बळी घेतले, तर रिचर्ड नागरावाने 2 विकेट मिळवल्या. अष्टपैलू कामगिरीसाठी सिकंदर रझाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
advertisement
झिम्बाब्वेचा तिसऱ्यांदा लंकेवर विजय
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेने तिसऱ्यांदा श्रीलंकेचा पराभव केला. या वर्षाच्या सुरुवातीला, हरारेमध्ये झिम्बाब्वेने श्रीलंकेचा 5 विकेट्सने पराभव केला, तर 2024 मध्ये त्यांनी कोलंबोमध्ये श्रीलंकेचा 4 विकेट्सने पराभव केला. धावांच्या बाबतीत, हा झिम्बाब्वेचा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पूर्ण सदस्य टीमविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 11:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SL vs ZIM : फक्त दोघांचाच दोन आकडी स्कोअर, झिम्बाब्वेचा T20 मधला सगळ्यात मोठा विजय, श्रीलंकेची लाज गेली!


