Accident News : ट्रकमधील बिघाड बघायला रस्त्यावर उतरले अन् घात झाला,क्षणात होत्याचं नव्हतं,नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत अजिंठा घाटातील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Accident News : अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत अजिंठा घाटातील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकमध्ये अचानक बिघाड झाल्याने रस्त्यावर वाहन थांबवून बिघाड बघायला गेलेल्या वाहनचालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत आता ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. व्ही. एम. एम. कुमार (वय 49), रा. आंध्रप्रदेश असे या मृत चालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा घाटातील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. यात ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत चालकाची ओळख व्ही. एम. एम. कुमार (वय 49), रा. आंध्रप्रदेश अशी आहे. या घटनेने कुमार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीप्रमाणे, ट्रकमध्ये अचानक बिघाड झाल्याने चालकाने घाटातील वळणावर रस्त्याच्या कडेला वाहन थांबवले होते. त्याचदरम्यान समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत चालकाला चिरडून पळ काढला. यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अजिंठा घाटातील अरुंद रस्ते आणि सतत होणारे अपघात यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या वळणावर तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 20, 2025 11:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News : ट्रकमधील बिघाड बघायला रस्त्यावर उतरले अन् घात झाला,क्षणात होत्याचं नव्हतं,नेमकं काय घडलं?


