भन्नाट स्टार्टअप! 'या' तरुणीनं शेवग्यापासून बनवलं पौष्टिक चॉकलेट, गोड चवीला मिळाली आरोग्याची जोड
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
राजकोटच्या कृपा बोडा यांनी 'मोरीक डिलाइट' हे शेवग्यापासून बनवलेले आरोग्यदायी चॉकलेट तयार केले आहे. SSIP धोरणाचा लाभ घेऊन त्यांनी हे स्टार्टअप सुरू केले. गूळ, खजूर, साखर आणि...
चॉकलेट म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. बाजारात वेगवेगळ्या चवीनं आणि रंगांनी सजलेली चॉकलेट्स मिळतात, पण आज आपण अशा एका चॉकलेटबद्दल जाणून घेणार आहोत जी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
ही खास चॉकलेट बनलेली आहे शेवग्यापासून, ज्याला इंग्रजीत Drumstick किंवा Moringa म्हणतात. शेवग्यात भरपूर पोषणमूल्यं, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असतात. या चॉकलेटचं नाव आहे – "मोरिक डिलाईट", आणि ती बनवली आहे राजकोटच्या एका तरुण उद्योजिकेनं, तिचं नाव आहे कृपा बोडा.
छोटी सुरुवात आता घेतली मोठी झेप
राज्य सरकारच्या "स्टुडंट स्टार्टअप अॅण्ड इनोव्हेशन पॉलिसी 2.0" (SSIP) अंतर्गत क्रुपा हिनं हे आरोग्यदायी चॉकलेट बनवण्याचा प्रकल्प सुरू केला. तिनं 2019 मध्ये मातृश्री वीरबाई महिला सायन्स कॉलेज, राजकोट येथे बीएस्सी केमिस्ट्रीला प्रवेश घेतला आणि तेव्हाच काही तरी वेगळं, नवं करण्याचं ठरवलं. सौराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या SSIP बूट कॅम्पमध्ये तिनं आपला शेवग्याच्या चॉकलेटचा प्रकल्प सादर केला. प्रा. चेतन ठाकर आणि प्रा. भावना वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली या कल्पनेची निवड झाली.
advertisement
गोडवा – पण नैसर्गिक!
Local 18 शी बोलताना कृपा म्हणाली, "शेवग्यामध्ये अनेक पोषणमूल्यं असतात. त्यामुळं ते वजन कमी करण्यातही मदत करतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आणि बदलत्या आहारशैलीत हे आरोग्यदायी चॉकलेट फायदेशीर ठरेल असं वाटलं." या चॉकलेटमध्ये कसलाही कृत्रिम रंग वापरलेला नाही. हे शेवगा नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून घेतला जातो आणि गोडवा मिळतो तो गुळ, साखर, खजूर आणि मध यांमधून!
advertisement
FSSAI पासून पेटंटपर्यंत!
कृपानं आपल्या चॉकलेटसाठी FSSAI नोंदणी नंबर मिळवले आहेत आणि त्याचं प्रयोगशाळांमध्ये चाचणी परीक्षणही पूर्ण केलं आहे. आता ती या चॉकलेटसाठी पेटंट मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे. चॉकलेटच्या गुणवत्तेमुळे ती शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये विक्रीही करते. SSIP धोरणाअंतर्गत 2.50 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. कृपानं आपल्या व्यवसायाची सुरुवात फक्त 15 हजार रुपयांत केली होती आणि आता तिचं काम चांगलं चाललंय. ती म्हणते, "या धोरणामुळे महिला उद्योजिकांना खूप प्रोत्साहन मिळतंय. एकेकाळची जॉब सीकर आता जॉब गिव्हर झाली आहे, याचा मला अभिमान आहे."
advertisement
हे ही वाचा : ‘कुतूबमिनार’ उभारण्यासाठी तोडली होती 27 हिंदू-जैन मंदिरे? इतिहासकारांनी सांगितलं त्यामागचं सत्य!
हे ही वाचा : या मंदिरात देवाची नव्हे, तर कुत्र्याची होते पूजा; महिला पुजारी करते आरती, भक्तांच्या इच्छा होतात पूर्ण
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 28, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
भन्नाट स्टार्टअप! 'या' तरुणीनं शेवग्यापासून बनवलं पौष्टिक चॉकलेट, गोड चवीला मिळाली आरोग्याची जोड