'या' शेतकऱ्याने केली कमाल; 10x10 च्या खोलीत लाखोंची कमाई, इतरांना दाखवली शेतीची नवी दिशा!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
चारणदास साहूंनी 2002 मध्ये कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन मशरूम शेती सुरू केली. त्यांनी पॅरा, बटर आणि ऑइस्टर मशरूमचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले. साहूंनी स्वतः...
धडपडी माणसं सतत काही ना काही नवे प्रयोग यशस्वी करून दाखवतात. असाच एक शेतकऱ्याची गोष्ट लक्षवेधक आहे. तर ही व्यक्ती आहे छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील बन्हारडी गावची. त्याचं नावंचरणदास साहू यांनी मशरूमची शेती यशस्वी करून दाखवली. आता आजूबाजूचे शेतकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेत मशरुमच्या शेतीकडे वळताना दिसत आहेत. साहू हे मोठ्या प्रमाणावर मशरूमचं उत्पादन घेतात आणि स्थानिक बाजारात विकतात.
पहिल्यांदा मशरुम शेतीचं कौशल्य मिळवलं...
चरणदास साहू यांनी 2002 साली कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर मशरूम शेतीला सुरुवात केली. त्यांनी पॅरा मशरूम, बटर मशरूम आणि ऑयस्टर मशरूम पिकवण्यात चांगलं कौशल्य मिळवलं आहे. इतकंच नाही, तर साहू स्वतःच मशरूमचे बी तयार करतात. चरणदास इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनाही मशरूम उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
इतर शेतकऱ्यांनी मशरुम शेतीचं ज्ञान दिलं
वेळोवेळी ते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात, जेणेकरून इतर शेतकरीही या फायदेशीर शेतीत सहभागी होऊ शकतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. बाजारात ऑयस्टर मशरूमला चांगली मागणी आहे. साहू सांगतात की, ते वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमचे उत्पादन करून दरवर्षी लाखो रुपये कमावत आहेत. त्यांच्या मेहनतीने आणि योग्य तंत्रामुळे ते आता शेतीतले नवे चॅम्पियन बनले आहेत.
advertisement
ते सांगतात, "मशरूमची शेती अगदी कमी जागेतही करता येते. यासाठी मोठ्या शेताची गरज नाही. 10 बाय 10 फुटांची छोटी खोली किंवा शेडही पुरेसा आहे. त्यात भाताचा कोंडा किंवा धान्याचा भुसा वापरून मशरूम घेतले जातात."
मशरूम उत्पादन करण्याची पद्धत
पॅरा मशरूमसाठी भाताचा कोंडा चार प्रकारे तयार केला जातो. त्यानंतर तो सावलीत पसरवून त्यात बी लावलं जातं, जे 8-10 दिवसात तयार होतं. ऑयस्टर मशरूमसाठी धान्याच्या भुसाला चुना आणि पाण्याच्या द्रावणात प्रक्रिया केली जाते. मग एचएम बॅगमध्ये एकावर एक थर लावून त्यात बी टाकलं जातं. हे पीक सुमारे 22 ते 25 दिवसात तयार होतं. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले मशरूम आरोग्यासाठी चांगले असतात आणि बाजारात त्यांना खूप मागणी आहे. साहू याच पद्धतीने मशरूमचं उत्पादन घेतात आणि इतरांनाही याचं प्रशिक्षण देतात.
advertisement
हे ही वाचा : जिद्द अन् मेहनत अफाट! दिव्यांग असूनही मानली नाही हार, 35 वर्षे एका पायावर केली शेती, आता...
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 24, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
'या' शेतकऱ्याने केली कमाल; 10x10 च्या खोलीत लाखोंची कमाई, इतरांना दाखवली शेतीची नवी दिशा!


