HSC Result: भीषण अपघातात 10 जण गेले, दोघे भाऊ बचावले, बारावीच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश!

Last Updated:

HSC Result: नाशिकमधील द्वारका उड्डाणपूल अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला होता. या गंभीर अपघातातून वाचलेल्या दोघा भावांनी बारावी परीक्षेत यश मिळवलं.

HSC Result: भीषण अपघातात 10 गेले, दोघे भाऊ बचावले, बारावीच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश!
HSC Result: भीषण अपघातात 10 गेले, दोघे भाऊ बचावले, बारावीच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश!
नाशिक: जानेवारी 2025 मध्ये नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला होता. यामध्ये 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघा चुलत भावंडांनी स्वत:ला सावरत मोठ्या जिद्दीने बारावीची परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून साहिल उत्तम काळे आणि ओम विष्णू काळे यांनी यश संपादन केलंय.
ओम आणि साहिल हे सिडको येथील रहिवासी आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासोबत असणारे 10 मित्रांचा अपघाती मृत्यू झाला होता. अशा परिस्थितीतून सावरत त्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला. तसेच लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली. या बारावी बोर्डाच्या परीक्षेत साहिलला 63.67 टक्के गुण मिळाले आहेत. तर ओमला 53.33 टक्के गुण मिळाले आहेत.
advertisement
द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात
नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी धार्मिक कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये टेम्पोतील स्टील शरीरात घुसल्याने 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान 5 जणांना जीव गमवावा लागला. याच अपघातात ओम विष्णू काळे (18 सह्याद्रीनगर) आणि साहिल उत्तम काळे ही चुलत भाऊ गंभीर जखमी झाले होते.
advertisement
जिद्दीनं केला अभ्यास
गंभीर जखमी असल्याने ओम आणि साहिल यांच्या बारावी परीक्षा देण्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, दोघांनी स्वत:ला सावरत अभ्यास केला आणि जिद्दीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षेसाठी लेखनिक घ्यावा लागला. शेवटी मोठ्या प्रयत्नांनी परीक्षा दिली आणि आता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोघांनीही घवघवीत यश संपादन केलंय.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
HSC Result: भीषण अपघातात 10 जण गेले, दोघे भाऊ बचावले, बारावीच्या परीक्षेत मिळवलं घवघवीत यश!
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement