Success Story: वडिलांचं स्वप्न अधूरं राहिलं पण पोरानं बापाचं मन जिंकलं, पंकज झाले Deputy collector
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आर्थिक चणचणीमुळे UPSC देता आलं नाही, बापाचं स्वप्न पोरानं पूर्ण केलं, पंकज झाला Class-1 अधिकारी
वडिलांची इच्छा होती कलेक्टर व्हावं पण आर्थिक परिस्थिती नसल्याने आणि त्यावेळी साधनं नसल्याने ते शक्य झालं नाही. पण वडिलांची इच्छा पोराला माहिती होती, वडिलांचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही मात्र त्यांच्या डोळ्यातला आनंद मात्र त्यांनी आणला. पोरानं आपार मेहनत घेतली आणि क्लास वन अधिकारी झाले. कोणतेही क्लास न लावता, सेल्फ स्टडी करून त्याने चौथ्या प्रयत्नात डेप्युटी कलेक्टरची पोस्ट मिळवली आहे. त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.
मध्य प्रदेश लोक सेवा आयोगाचा नुकताच निकाल लागला. 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा अंतिम निकाल लागला. देवास जिल्ह्यातील भौंसार परिसरातील रहिवासी असलेल्या पंकज परमार यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळवलं. पहिले तीन प्रयत्न हुकले. कोणतेही क्लास न लावता त्यांनी स्वत: अभ्यास केला आणि हे यश संपादन केलं. त्याचं हे यश पाहून गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. पंकजचे वडील समंदर सिंह परमार हे शाळेत प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहात आहेत.
advertisement
UPSC देऊन IAS व्हायचं समंदर सिंह परमार यांचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक चणचण आणि परिस्थितीसमोर त्यांना नमतं घ्यावं लागलं. मात्र त्यांनी हेच स्वप्न मुलात पाहिलं, मुलाने IAS नाही पण डेप्युटी कलेक्टर पद मिळवून दाखवलं. डेप्युटी कलेक्टर पदही आजच्या घडीला मिळणं हे काही कमी नाही, त्यामुळे मला माझ्या मुलाचा अभिमान आहे असं वडील समंदर सिंह म्हणाले. हा जल्लोष गावभर साजरा केला.
advertisement
ग्रामीण पार्श्वभूमी आलेल्या पंकज परमार यांचं यश हे देखील विशेष आहे. त्यांनी कोचिंगशिवाय परीक्षा उत्तीर्ण केली आणि सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवलं. उपजिल्हाधिकारी होण्यापूर्वी पंकज परमार यांना दोनदा मुलाखत आणि तीन वेळा मुख्य परीक्षेला बसावे लागले, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिले. त्यांनी दररोज सात ते आठ तास नियमितपणे अभ्यास केला आणि यश मिळवले. पंकज परमार यांचे वडील समंदर सिंग परमार हे जामगोड येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत कार्यवाहक प्राचार्य आहेत. त्यांची आई प्रेमलता परमार गृहिणी आहेत. त्यांचा मोठा भाऊ छायाचित्रकार आहे आणि त्यांची मोठी बहीण कर्मा परमार जिल्ह्यातील चौबाराधीरा येथे शिक्षिका म्हणून काम करतात.
advertisement
पंकज यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण देवास येथील उत्कृष्ट विद्यालयात पूर्ण केले, तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी भोपाळ येथून संगणक शास्त्रात बी.टेक केले. सुरुवातीला पंकज त्यांच्या गावी, सुमराखेडी येथून भाऊनरासा येथे सायकलने किंवा पायी प्रवास करत होते. पुढील अभ्यासासाठी, तो जादूच्या वाहनाने देवासमधील सरकारी शाळेत गेला. त्याने कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला नाही, घरीच सेल्फ स्टडी करुन तयारी केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 2:33 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: वडिलांचं स्वप्न अधूरं राहिलं पण पोरानं बापाचं मन जिंकलं, पंकज झाले Deputy collector


