Success Story: शिक्षणासाठी पैसे नव्हते, आज तिच्यावर पुण्याचे लाखो लोक विश्वास ठेवून प्रवास करतात, मुरबाडच्या मेट्रो गर्लची संघर्षमय कहाणी

Last Updated:

मुरबाडच्या प्रगती दीपक कोर पुणे मेट्रोमध्ये वरिष्ठ लोको पायलट आहेत, त्यांनी ग्रामीण भागातून येऊन हजारो महिलांना प्रेरणा दिली आणि प्रशिक्षणही दिले.

News18
News18
मुली कुठेही कमी नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं, मुलीच्या हाती जसं स्वयंपाकघर दिलं जातं, तितक्याच सफाईदारपणे ती गाडीचं, कामाचं इतर जबाबदाऱ्याही उत्तम पार पडू शकते हे वेळोवेळी सिद्ध केलं आहे. आज मुरबाडच्या लेकीनं अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव केलं. तिच्या या देदीप्यमान यशाचं कौतुक तर आहेच पण इतक्या ग्रामीण भागातून येणाऱ्या पोरीनं हे करुन दाखवलं म्हटल्यावर तिथल्या इतर मुलींना देखील एक नवीन प्रेरणा मिळाली आहे.
मुरबाड तालुक्यातील आसोळे या एका छोट्याशा गावातून मुलगी आज थेट पुणे मेट्रोच्या केबिनमध्ये बसून हजारो चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षित पोहोचवत आहे. ही कहाणी आहे प्रगती दीपक कोर यांची. प्रगती केवळ मेट्रो चालवत नाहीत, तर त्या त्यांच्यासारख्या हजारो मुलींना मोठी स्वप्नं पाहण्याची नवी दिशा देत आहेत. पुण्यात त्यांची मेट्रोच्या लोको पायलटपदी नियुक्ती झाली आहे.
advertisement
प्रगती यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे आत्मविश्वास, संघर्ष आणि निर्धाराची एक जिवंत कहाणी आहे. आज त्या पुणे मेट्रोमध्ये वरिष्ठ लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे, त्या पुरुष सहकाऱ्यांसोबतच १०० हून अधिक महिला पायलट असलेल्यांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत. मुरबाडसारख्या ग्रामीण भागातून येऊन मेट्रो लोको पायलट बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
advertisement
शिक्षणात अडचणी पण कौशल्यानं सांभाळली जबाबदारी
२७ वर्षांच्या प्रगती कोर यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण मुरबाडमध्ये झालं. दहावीत चांगले गुण मिळवल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला आणि नंतर ए.सी.पी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. मोठी बहीण शिकत असल्याने, घरात आर्थिक चणचण होती. शहरात राहण्याची सोय, शिक्षण आणि घर चालवण्यासाठी पार्ट-टाईम काम करण्याची कसरत त्यांनी कौशल्याने सांभाळली. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणूनही काही काळ काम केले. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी समाधानाचा ठरला आहे.
advertisement
मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून रुजू
प्रगती यांनी २०२० साली शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, ५ सप्टेंबर २०२२ रोजी वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्या अधिकृतपणे मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून रुजू झाल्या. कठोर परिश्रम, तांत्रिक कौशल्ये आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी मेट्रो पायलटच्या लेखी परीक्षा आणि मुलाखती यशस्वीपणे पार केल्या. आज त्या पुणे मेट्रोमध्ये रुजू होऊन हजारो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी सांभाळत आहेत. सुरुवातीला त्यांनी मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावर मेट्रो चालवली. पण आता त्या पुणे मेट्रोमध्ये नव्या महिला पिढीला मार्गदर्शन करत आहेत.
advertisement
प्रगती म्हणते...
प्रगती सांगतात की, त्यांच्या कुटुंबात दूरदूरपर्यंत कोणीही या क्षेत्रात नाही. त्यामुळे जेव्हा त्या पहिल्यांदा मेट्रोच्या नियंत्रण कक्षात बसतात, तेव्हा त्यांना अखंड आणि अनोखा अभिमान वाटतो. आई-वडीलही त्यांच्या या यशाने आनंदात गदगद झाले आहेत. एका छोट्या गावातून आलेल्या मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रवाशांच्या स्वप्नांना आणि स्वतःच्या भविष्याला कशी दिशा दिली आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रगती कोर आहेत. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणींसाठी प्रेरणा आहे.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Success Story: शिक्षणासाठी पैसे नव्हते, आज तिच्यावर पुण्याचे लाखो लोक विश्वास ठेवून प्रवास करतात, मुरबाडच्या मेट्रो गर्लची संघर्षमय कहाणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement