AI : मदत करणारा मित्र की खतरनाक दुश्मन? प्रोफेशनल आयुष्यात Artificial Intelligence किती रिस्की?

Last Updated:

एआय चॅटबॉट, चॅटजीपीटी अशा नव्या टूल्समुळे एआयची विशेष चर्चा होऊ लागली. त्याआधीपासूनच एआय विविध क्षेत्रांमध्ये वापरलं जात आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सध्याचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आहे. आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर केला जाऊ लागला आहे. यामुळे गोष्टी सोप्या होतात; मात्र एआयचे जसे फायदे आहेत, तसंच काही तोटेही आहेत. एक इंजिनीअर आणि संशोधकाने त्याबाबतची एक घटना उघडकीस आणली. एआयमुळे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, असं त्यांच्या निदर्शनास आलं.
एआय चॅटबॉट, चॅटजीपीटी अशा नव्या टूल्समुळे एआयची विशेष चर्चा होऊ लागली. त्याआधीपासूनच एआय विविध क्षेत्रांमध्ये वापरलं जात आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कंपन्यांची कामाची पद्धत बदलली आहे. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचे काही फायदे असतात, तसंच काही तोटेही असतात. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचं काम कंपन्या करतात. असं असलं तरी एआयच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
advertisement
एआयमुळे अनेक क्षेत्रांमधल्या माणसांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. आता एका संशोधकांनी एआयचा धोका दाखवून देणारा त्यांचा एक अनुभव सांगितला आहे. संशोधक आणि इंजिनीअर अ‍ॅलेक्स बिल्जेरियन यांनी ओटर एआय या झूम मीटिंग ट्रान्स्क्राइब करण्यासाठीच्या एआय प्लॅटफॉर्मबद्दलचा त्यांचा एक अनुभव सांगितला. त्यावरून एआयमुळे ऑफिसमधल्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलंय. झूम मीटिंगमधून लेफ्ट झाल्यानंतरही स्मार्ट असिस्टंटने गोपनीय चर्चा रेकॉर्ड केल्या होत्या, असं त्यांच्या निदर्शनास आलं.
advertisement
एआयच्या वापरामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. अ‍ॅलेक्स बिल्जेरियन यांनी अनुभवलेली गोष्ट जेव्हा कंपनीच्या लक्षात आली, तेव्हा कंपनीनं त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. ओटर एआय युझर्सची गोपनीयता राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं कंपनीने म्हटलंय. युझर्ससाठी त्यांची गोपनीयता किती महत्त्वाची आहे, याची जाणीव कंपनीला असून त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलंय. युझर्सकडे कंझर्व्हेशनबाबत संपूर्ण नियंत्रण असतं. त्यांना हवं तेव्हा ते बदलू शकतात, असं कंपनीनं स्पष्ट केलंय.
advertisement
ओटर पायलट हा एआय असिस्टंट असून तो मीटिंग रेकॉर्ड करतो व ती ट्रान्स्क्राइब करण्याचं काम करतो. हे एआय टूल मीटिंगच्या कॉलमधून केवळ ऑडिओ रेकॉर्ड करतं. ज्या युझर्सनी म्यूट केलं असेल, त्यांचा ऑडिओ तो रेकॉर्ड करत नाही. तसंच मीटिंग रेकॉर्ड करताना युझर्सला तसं कळवलं जातं, असं कपनीनं म्हटलं आहे; मात्र एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा संशोधक व प्रायव्हसी अ‍ॅडव्होकेट नाओमी ब्रोकवेल यांनी दिलाय. कंपन्यांमधली गोपनीय माहितीही यामुळे बाहेर जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलंय. एआयच्या वापराचे जसे फायदे आहेत, तसंच काही धोकेही आहेत. हळूहळू ते समोर येऊ लागले आहेत.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
AI : मदत करणारा मित्र की खतरनाक दुश्मन? प्रोफेशनल आयुष्यात Artificial Intelligence किती रिस्की?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement