Cars Under 5 Lakhs: 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत सर्वात भारी कार; मायलेजही जबरदस्त
- Published by:Meenal Gangurde
Last Updated:
कार घेण्याचा विचार करीत असाल तर हा पर्याय नक्की पाहा.
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : तुम्ही कमी बजेटमध्ये चांगली आणि परवडणारी कार घेण्याचा विचार करताय? खरं तर चांगली टॉप मॉडेल कार घ्यायचं म्हटलं की बजेट वाढतंच. ती 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणं कठीण आहे; पण कार कंपन्यांनी सर्वसामान्य माणसाचं बजेट लक्षात घेऊन काही उत्तम कार्स कमी किमतीतही बनवल्या आहेत. देशात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात कार्सची विक्री होते.
advertisement
त्यामध्ये हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही आणि लक्झरी कार्सच्या अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. परंतु सर्वाधिक विक्री हॅचबॅक सेगमेंटमध्ये होते. कारण त्या आकाराने लहान असतात आणि त्यांची किंमतही कमी असते. याशिवाय त्या अधिक मायलेजही देतात. तुम्हालाही स्वस्त कार घ्यायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
advertisement
मारुती अल्टो K10
मारुती सुझुकीची Alto K10 ही सध्या देशातली सर्वांत परवडणारी कार आहे. ही बाजारात Std, Lxi, Vxi, Vxi+ अशा चार व्हॅरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यात 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ते 67bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करतं. कारची बूट स्पेस 214 लिटर आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.
advertisement
रेनॉ क्विड
तुम्ही 5 लाखांपेक्षा कमी किमतीत कार घेण्याचा विचार करत असाल तर रेनॉ क्विड हा एक उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये दोन इंजिनांचा पर्याय आहे. त्यापैकी एक 1.0 लिटर 3-सिलिंडर पेट्रोल आणि दुसरं 0.8 लिटर 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
मारुती सुझुकी एस-प्रेसो
मारुतीच्या या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 66 बीएचपी पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करतं. यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे. ही कार सीएनजीवर प्रति किलो 32 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देते.
advertisement
मारुती इको
मारुती इको ही कार 5 आणि 7 सीटर लेआउटमध्ये येते. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 72.4 बीएचपी पॉवर आणि 98 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार CNG वर प्रति किलो 20 किलोमीटर मायलेज देते. तिची एक्स-शोरूम किंमत 5.27 लाख रुपये आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 1:45 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Cars Under 5 Lakhs: 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत सर्वात भारी कार; मायलेजही जबरदस्त