तुम्ही चोरीचा फोन तर विकत घेत नाही ना? फक्त एक SMS आणि काही सेकंदात होईल पोलखोल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्ही सेकंडहँड मोबाईल विकत घेण्याचा विचार करत असाल तर सावधान, तो चोरीचा फोन असू शकतो.
मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचं सेकंड हँड मार्केट खुप मोठं आहे. असे अनेक लोक आहेत जे सेकंड हँड वस्तू विकत घेतात. पण असं असलं तरी देखील इलेक्ट्रिकल वस्तू विकत घेताना नीट विचारपूर्वक गोष्टी घेणं गरजेचं आहे. नाहीतर एक चुकीचा निर्णय तुमच्यावर पश्चातापाची वेळ आणू शकतं.
हल्ली अनेक लोक फोन सेकंड हँड घेऊ लागले आहेत. पण यामध्ये चोरीचा फोन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पण मग असं असेल तर आपल्याकडे फोन चोरीचा आहे हे कसं ओळखायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल?
काळजी करु नका आम्ही तुम्हाला हे शोधण्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. ही ट्रिक खूपच साधीसोप्पी आहे. जी एका SMS वर सगळा प्रकार समोर आणेल. एका सोशल मीडिया इंफ्लुएसरनं ही ट्रीक शेअर केली आहे. जी लोकांसाठी कामाची आहे. यामुळे काही मिनिटात सत्य समोर येणार आहे.
advertisement
इंस्टाग्राम पर hastech._ नवाच्या एका अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती सांगते की फोनमधून SMS करताच आपल्याला फोनचा IMEI नंबर मिळेल.
प्रत्येक मोबाइल फोनचा एक खास युनिक कोड असतो, ज्याला IMEI (International Mobile Equipment Identity) असं म्हणतात. हा कोड फोनची ओळख पटवण्यासाठी अत्यावश्यक असतो. आपला IMEI नंबर जाणून घेण्यासाठी आपल्या फोनच्या डायलरवर *#06# डायल करा. स्क्रीनवर 15 अंकी एक नंबर दिसेल, हाच तुमचा IMEI नंबर आहे.
advertisement
आता तुमच्याकडे IMEI नंबर आहेच, तर पुढील प्रक्रिया खूपच सोपी आहे. आपल्या फोनच्या मेसेज अॅपमध्ये जा आणि एक नवीन SMS टाइप करा. मेसेजमध्ये लिहा:
KYM
उदाहरणार्थ: KYM 123456789012345
हा मेसेज 14422 या क्रमांकावर पाठवा.
SMS पाठवल्यानंतर काही क्षणांतच तुमच्याकडे एक रिप्लाय येईल, ज्यामध्ये फोनची स्थिती दिलेली असेल. जर फोन वैध असेल, तर त्याची डिटेल्स जसं की ब्रँड, मॉडेल आणि अॅक्टिवेशन स्टेटस तुम्हाला मिळतील. पण जर तो फोन चोरीचा असेल किंवा ब्लॅकलिस्टेड असेल, तर त्याची माहितीही कळेल.
advertisement
जर तुम्ही कोणताही सेकंड हँड फोन न तपासता खरेदी केला आणि तो चोरीचा निघाला, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण या सोप्या ट्रिकमुळे तुम्ही अशा धोक्यांपासून वाचू शकता आणि योग्य व विश्वासार्ह डिव्हाइस खरेदी करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 5:28 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
तुम्ही चोरीचा फोन तर विकत घेत नाही ना? फक्त एक SMS आणि काही सेकंदात होईल पोलखोल